Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात जाड कपड्याचे कशी निगा राखवी? यासाठी काही खास टिप्स…

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 16, 2022 | 02:59 PM
हिवाळ्यात जाड कपड्याचे कशी निगा राखवी? यासाठी काही खास टिप्स…
Follow Us
Close
Follow Us:

सध्या थंडीची चाहूल जाणवत आहे. या दिवसात आपण थंडी पासून कसे संरक्षण करता येईल हे पाहत असतो. उबदार कपडे घातले की थंड हवेचा आणि गारव्याचा त्रास होत नाही. त्यामुळे हिवाळा लागला की थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, लेदर जॅकेट, हुडी, शॉल, मफ्लर, स्टोल, थर्मल्स, श्रग, कानटोपी, हातमोजे, पायमोजे यांनी बाजारपेठ फुलून जाते. हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी हे उबदार कपडे मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल असतो. जर आपण हे कपडे चुकीच्या पद्धतीने धुतले आणि वाळवले तर ते खराब होण्याची अधिक शक्यता असते. लेदर जॅकेट्स आणि बुट्स तर फारच नाजुकपणे सांभाळावे लागतात.

तुम्ही तुमचे उबदार कपडे कसे धुता हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण घाईघाईत सर्वच कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकतो. मात्र उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे खराब होतात. तुमच्या प्रत्येक कपड्यावर विकत घेताना एक लेबल लावलेलं असतं. त्त्या पाळल्यास तुमच्या कपड्यांचं नुकसान होत नाही. लोकरीचे अथवा उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये न धुता हलक्या हाताने टबमध्ये धुवावेत.

उबदार कपडे धुण्यासाठी डिर्टंजटचा वापर करू नये. लोकरीचे कपडे धुण्यासाठी खास सौम्य फॅब्रिक वॉश बाजारात मिळतात. अशा फॅब्रिक वॉश अथवा एखाद्या सौम्य शॅंम्पूने हे कपडे धुतल्यास या कपड्यांचा मऊपणा तसाच राहतो.

तुमचे लोकरीपासून तयार केलेले अथवा इतर सॉफ्ट कपडे धुतल्यानंतर चांगले वाळवल्याशिवाय कपाटात ठेवू नका. लोकरीच्या कपड्यांची घडी घातल्यावर दोन कपड्यांच्या आतील भागात टिश्यू पेपर अथवा बटर पेपर ठेवा. ज्यामुळे इतर कपड्यांचे रंग त्यांना लागणार नाहीत. सुकलेला सोनचाफ्याची फुलं अथवा कडूलिंबाची सुकलेली पानं एखाद्या सुती कापडात गुंडाळून कपाटात ठेवा. ज्यामुळे तुमच्या कपड्यांना हवेतील आर्द्रतेमुळे येणारा घाणेरडा वास येणार नाही.

लोकरीचे कपडे कधीच उन्हात सुकवू नये. हिवाळ्यात कपडे लवकर सुकण्यासाठी उन्हात कपडे वाळत घातले जातात. मात्र बऱ्याचदा लोकरीच्या कपड्यांना डाय करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर केलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे कपडे उन्हात वाळत घालता तेव्हा त्यांचा रंग फिकट होण्याची दाट शक्यता असते.

लोकरीचे कपडे घट्ट पिळून अथवा हॅंगरवर अडवून सुकवू नयेत कारण त्यामुळे त्यांचा आकार बदलण्याची दाट शक्यता असते. थंड हवेच्या ठिकाणी असे कपडे सुकवण्यासाठी खास ड्रायरचा वापर केला जातो.

प्रत्येक कापडाला इस्त्री करताना निरनिराळ्या तापमानाची गरज असते. लोकरीच्या कपड्यांना अगदी कमी तापमानावर इस्त्री करावी. शिवाय काही स्वेट टीशर्टंना आतील बाजूने हलक्या तापमानावर इस्त्री करावी लागते नाहीतर ते जळण्याची शक्यता जास्त असते.

लेदरचे कपडे अथवा लेदरचं जॅकेट तुम्ही ते कसं ठेवता हे खूप महत्त्वाचं आहे. लोदरचे कपडे तुम्ही धुवू शकत नाही. यासाठीच बाहेरून घरी आल्यावर ते थोड्यावेळ मोकळ्या हवेत ठेवून द्यावे. कारण आपल्या शरीराचा घाम त्यामध्ये मुरण्याची शक्यता असते. जरी तुम्ही ते धुवू शकला नाही तरी एखाद्या मऊ केस असलेल्या ब्रशने ते तुम्ही वरच्यावर स्वच्छ नक्कीच करू शकता असं केल्यामुळे त्यावरील धुळ निघून जाते.

 

Web Title: How to take care of thick clothes in winter some special tips for this nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2022 | 02:59 PM

Topics:  

  • Winter Tips news

संबंधित बातम्या

Bike Care in Winter: थंडी सुरू होण्यापूर्वी करा ‘हे’ काम! गाडी स्टार्ट करण्यात होणार नाही त्रास, इंजिनही राहील सुरक्षित
1

Bike Care in Winter: थंडी सुरू होण्यापूर्वी करा ‘हे’ काम! गाडी स्टार्ट करण्यात होणार नाही त्रास, इंजिनही राहील सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.