
उन्हाच्या लाटा अजूनही तेवढ्याच तीव्र असून अनेकांना याचा फटका बसत आहे. अनेक शहरांतील तापमान हे ५० अंशांच्या जवळजवळ पोहचले आहे. अशा परिस्थितीत घाम येणे, खाज, घामोळ्या, उष्माघात अशा अनेक समस्या निर्माण होत असतात. तुम्हालाही या उन्हळ्यात अशा समस्यांशी झुंज द्यावी लागत असेल तर या घरगुती ट्रिक तुमच्यासाठी फार फायद्याच्या ठरणार आहेत. २ औषधी पानांचा वापर करून तुम्ही अशा समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते. या पानांचे वैशिष्ट म्हणजे, यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे ते त्वचेची जळजळ, घामोळे कमी करण्यास मदत करू शकतात.
याशिवाय या पानांची पेस्ट शरीराला थंडावा मिळवून देते. ही दोन्ही पाने शरीरासाठी फार फायदेशीर मानली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की ही दोन पाने कोणती आणि यांचा वापर कसा करावा, तर चला मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
उन्हाळ्याच्या समस्यांवर पुदिना आणि कडुलिंबाची पाने ठरतात उपयुक्त
[read_also content=”कोकणातील चवदार फळ चुकीच्या पद्धतीने खाणं तरुणाला भोवलं, चेहरा हाथ जळला, खाण्याची योग्य पद्धत आणि फळाविषयी जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/eating-konkans-delicious-fruit-wrongly-eats-young-man-burns-his-face-and-hands-know-the-right-way-to-eat-and-know-the-fruit-540953.html”]
जळजळ कमी होण्यास मदत होईल
अनेकदा उन्हाळ्यात घामोळ्या आल्या की त्यात भागांत अतिरिक्त जळजळ होण्यास सुरुवात होते. घामोळ्या घालवण्यासाठी ही पाने अतिशय फायदेशीर ठरतील. यातील औषधी गुणधर्म घामोळ्यांचा नामोनिशाण दूर करेल. आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम ही पाने नीट धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्या. आता यात लिंबाचा रस टाका आणि नीट मिक्स करून घ्या. मग ही तयार पेस्ट घामोळ्यांवर लावून टाका. ही पेस्ट दररोज आंघोळीपूर्वी घामोळ्यांवर लावून नंतर पाण्याने धुवून काढा. नियमित याच्या वापराने घामोळ्या दूर होण्यास मदत होईल.
खाज, पुरळपासून आराम
खाज आणि पुरळपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना आणि कडुलिंबाच्या पानांत कोरफडीचा गर टाकून मिसळू शकता. यामुळे खाजेची समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्वचा आतून थंड पडते. कोरफड उष्मघातापासून होणार त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेवर खाज येत असल्यास कोरफडीचा वापर करावा.
कापूर आणि लवंगाचे तेल वापरता येईल
या दोन उपयांव्यतिरिक्त तुम्ही पुदिना आणि कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून त्यात कापूर आणि लवंगाचे तेल मिक्स करू शकता. हे घामोळे घालवण्यासाठी उपयुक्त ठरते. हे दीर्घकाळ प्रभावीपणे कमी करून चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासही मदत करते.
चंदनाचा वापर
उन्हळ्यात अनेकांना पाठीवर पुरळ येणाच्या समस्या उदभवत असतात.अशा परिस्थितीत तुम्ही चंदनाचा वापर करू शकता. यासाठी पुदिना आणि कडुलिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये चंदन मिसळून पाठीवर लावा आणि नंतर पाण्याने धुवून टाका. याने पुरळांची समस्या लवकरच दूर होईल.