
जान्हवी कपूरने शेअर केली फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत
सर्वच महिलांना अभिनेत्रींनसारखा सुंदर आणि नितळ चेहरा हवा असतो. त्वचेची चमक वाढवण्यासाठी महिला आणि वेगवेगळे उपाय करतात. कधी बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स आणून लावणे,फेशिअल करणे इत्यादी उपाय करतात. केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ चेहरा सुंदर आणि ग्लोइंग दिसतो. पण कालांतराने चेहरा पुन्हा एकदा होता तसाच होऊन जातो. त्यामुळे त्वचेला केमिकल उत्पादने लावण्यापेक्षा घरगुती पदार्थ वापरून त्वचेची काळजी घेतली पाहिजे. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी योग्य ते स्किन केअर फॉलो करणे सुद्धा आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)
बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या उत्तम अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. तिच्या निखळ आणि चमकदार त्वचेचे सगळीकडे अनेक फॅन आहेत. जान्हवी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करते? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. जान्हवी तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी यांनी सांगितलेला घरगुती उपाय करते.तिच्या आईने सांगितलेला घरगुती उपाय करून ती आपल्या त्वचेची काळजी घेतली. तसेच जान्हवी तिच्या सुंदर त्वचेसाठी नैसर्गिक पदार्थांचे सेवन करते. यामुळे तिची स्किन नेहमी ताजी टवटवीत दिसते. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी जान्हवी स्किन केअरमध्ये घरगुती पदार्थांपासूनबनवलेला फेसपॅक लावते. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची कृती.