
Janjira fort closed to tourists
मुरूड : पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरण समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्शवभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी २६ मेपासून पुरातत्व खात्याने किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पहाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरावे लागते. त्यातच पावसाळा समीप आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षितेच्या कारणावरून आजपासून ते पावसाळी हंगाम संपेपर्यंत किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे(Janjira fort closed to tourists).
याबाबतची अधिकृत माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग ऐलीकर यांनी सांगितली. मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग येत्या २६ मेपासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. परंतु मोठं मोठ्या लाटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी धडकत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी आजपासून किल्ला बंद करण्यात आल्याची माहिती ऐलीकर यांनी दिली आहे.
जंजिरा किल्ला पहाण्यासाठी दर वर्षी पाच लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देत असतात. जंजिरा पाहण्यासाठी येणार्याद पर्यटकांमुळे येथील बोटचालक, लॉन्चमालक यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. जंजिरा किल्ला बंद झाल्याने स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता पावसाळी हंगाम संपताच पुन्हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मागील वर्षात जंजिरा किल्ला हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार कमी कालावधीसाठी सुरु ठेवण्यात आला होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किल्ला सुरु करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांना रोजगारासाठी फारच अल्प व्यवसाय मिळाला होता, परंतु आता पावसाळी हंगामासाठी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]