Fluffy pancakes recipe: सोशल मीडियावर गाजतायत जपानी फ्लफी पॅनकेक्स, घरीच बनवा मऊ, स्पंजी आणि जाडसर पॅनकेक्स!

Fluffy pancakes recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे आणि स्वादिष्ट बनवायचे असेल, तर जपानी फ्लफी पॅनकेक्सची रेसिपी नक्की करून पाहा. मऊ, जाडसर आणि स्पंजी पोत असलेले हे पॅनकेक्स अंडी, मैदा, दूध आणि साखर यांसारख्या घरातील मोजक्या साहित्यापासून तयार करता येतात. जाणून घ्या हे पॅनकेक्स बनवण्याची सोपी रेसिपी आणि ते अधिक मऊ व फुललेले होण्यासाठी काही खास टिप्स.
 fluffy pancakes(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
fluffy pancakes(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या रेसिपी व्हायरल होताना दिसतात. यामध्ये जपानी फ्लफी पॅनकेक्सची विशेष चर्चा आहे. सर्व स्त्रियांना सकाळी काय बनवायचे हा नेहमीच विचार पडतो त्यासाठी त्यांनी ही रेसिपी एकदा तरी करून पाहावी . दिसायला जाडसर, खायला मऊ आणि स्पंजी असणारे हे पॅनकेक्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतात.ज्यांना सकाळी हलकाफुलका खायला आवडत त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे. विशेष म्हणजे हे पॅनकेक्स तयार करण्यासाठी फार महागड्या साहित्याची गरज नाही. घरातील काही मोजक्या पदार्थांचा वापर करून तुम्ही ही रेसिपी सहज तयार करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या गोड खाण्याच्या इच्छेसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

 fluffy pancakes(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क

फ्लफी पॅनकेक्स बनवण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे?

जपानी फ्लफी पॅनकेक्स तयार करण्यासाठी अर्धा कप मैदा, दोन अंडी, दोन टेबलस्पून दूध, तीन टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा टीस्पून लिंबाचा रस आणि आवश्यकतेनुसार बटर घ्या. सजावटीसाठी पिठीसाखर, स्ट्रॉबेरी, केळी, मध किंवा व्हिप्ड क्रीम वापरू शकता.

अशी तयार रेसिपी करा.

सर्वप्रथम दोन अंड्यांचा पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करून घ्या. एका भांड्यात अंड्याचा पिवळा भाग, दूध आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करा. त्यामध्ये चाळलेला मैदा आणि बेकिंग पावडर घालून गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा.

आता दुसऱ्या स्वच्छ आणि कोरड्या भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस घालून फेटण्यास सुरुवात करा. मिश्रण फेसाळल्यानंतर त्यात थोडी थोडी साखर घाला. मिश्रण घट्ट, चमकदार आणि आकार टिकवून ठेवणारे होईपर्यंत फेटा. यामुळे पॅनकेक्सला हलका आणि स्पंजी पोत मिळतो.

त्यानंतर तयार झालेला फेस मैद्याच्या मिश्रणात थोडा थोडा घाला. चमच्याने किंवा स्पॅचुलाच्या मदतीने हलक्या हाताने एकत्र करा. मिश्रण जास्त ढवळू नका. अन्यथा त्यातील हवा निघून जाऊ शकते आणि पॅनकेक्स अपेक्षेप्रमाणे फुलणार नाहीत.

आता नॉनस्टिक पॅनला थोडे बटर लावा. मंद आचेवर चमच्याच्या मदतीने मिश्रणाचे जाडसर गोल भाग पॅनमध्ये ठेवा. पॅनच्या बाजूला थोडे पाणी घालून झाकण ठेवा. साधारण चार ते पाच मिनिटे शिजवा. त्यानंतर पॅनकेक्स अलगद उलटून पुन्हा तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून शिजवा. ते आतपर्यंत शिजले आहेत याची खात्री करा.

 fluffy pancakes(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Crochet: तुम्हीही क्रोशे विणकाम करताय का? जाणून घ्या धाग्यांचे प्रकार आणि विणकाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात!

पॅनकेक्स अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी टिप्स जाणून घ्या.

तयार पॅनकेक्स प्लेटमध्ये काढून त्यावर पिठीसाखर भुरभुरा. सोबत स्ट्रॉबेरी, केळी, मध किंवा व्हिप्ड क्रीम घालून सर्व्ह करा. पॅनकेक्स बनवताना अंड्याचा पांढरा भाग फेटण्यासाठी भांडे स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. तसेच गॅस नेहमी मंद ठेवा. मिश्रण हलक्या हाताने एकत्र केल्यास पॅनकेक्सचा स्पंजीपणा टिकून राहण्यास मदत होते. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी जपानी फ्लफी पॅनकेक्सचा आस्वाद घेऊ शकता.