अक्कल दाढेच्या दुखण्यावर काही उपाय
◼️दाढीच्या ठिकाणी बर्फ लावावा कारण दाढदुखीमुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्यानंतर थांबेल.
◼️मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीत आराम मिळतो.
◼️कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या दुखण्यावरही फरक जाणवतो.
◼️दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढेवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढेवर ठेवा. तुम्हाला आराम मिळेल.
◼️तुम्ही लवंग बारीक करून दाढेवरही लावू शकता.
◼️सूज कमी करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून दाढेवर ठेवता येतात. त्याचप्रमाणे, आले सूज कमी करण्यास देखील मदत करते.
◼️हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. तुम्ही थेट दाढीवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील.
◼️एलोवेरा जेल देखील वापरू शकता. कोरफडीच्या पानांमधून थेट जेल काढा आणि दाढेवर ठेवा.
असे काही सोपे उपाय आपण करू शकतो, परंतु दाढेमुळे खूपच जास्त त्रास असेल तर मात्र दंत वैद्याचा सल्ला घ्यावा.