फोटो सौजन्य: Freepik
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जणांच्या आयुष्यात बदल होत आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे रात्री उशिरा जागणे. जर तुम्ही सुद्धा रात्री उशिरापर्यंत जागत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.
आपल्याकडे नेहमीच लवकर झोपणे आणि लवकर उठण्याचा प्राधान्य दिले आहे. परंतु आजकाल फक्त तरुणच नाही तर जेष्ठ लोकं सुद्धा रात्री उशिरापर्यंत जागे असतात. काही जण रात्री चॅटिंग करणं पसंत करतात तर काही चित्रपट बघणं. खरंतर मोबाईलमुळे लोकांची रात्रीची झोप कमी झाली आहे. पण उशिरा झोपण्याची ही सवय तुम्हाला डायबिटीस टाईप 2 चा बळी बनवू शकते.
नेदरलँडमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात असे म्हटले आहे की जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यांना मधुमेह 2 चा धोका 46 टक्क्याने जास्त असतो. किंबहुना, चुकीच्या जीवनशैलीसह झोपेचा दर्जाही कमी असल्याने मधुमेहाचा धोका वाढत असावा.
हे देखील वाचा: अंजीरच्या पाण्याचे आहेत अफलातून फायदे, पुरूषांना होईल उपाशीपोटी पिण्याचा फायदा
नुकत्याच झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका इतरांपेक्षा 46 टक्के जास्त असतो. नेदरलँडमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासात जास्त वजन असलेल्या पाच हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.
हे लोकं तीन भागात विभागले गेले होते. प्रथम, जे लवकर जागे होतात (लवकर क्रॉनोटाइप), दुसरे, जे सरासरी वेळेला जागे होतात (मध्यम क्रॉनोटाइप) आणि तिसरे, जे उशीरा जागे होतात (उशिरा क्रोनोटाइप). या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन युनियनच्या बैठकीतही दाखवले जाणार आहे.
अभ्यासात असे म्हटले आहे की जे लोकं रात्री उशिरा झोपतात त्यांचे बायो क्लॉक बिघडते ज्यामुळे त्यांच्या शरीरात टाइप 2 डायबिटीस आणि मेटाबॉलिज्मची समस्या उद्भवू शकते. जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यांना उच्च BMI, पोटावरील चरबी, फॅटी लिव्हर आणि व्हिसेरल फॅट जमा होणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
मध्यम क्रोनोटाइप असलेल्या लोकांच्या तुलनेत उशीरा क्रोनोटाइप असलेल्या लोकांना डायबिटीस टाईप 2 होण्याचा धोका वाढतो. यामागील कारणांमध्ये शरीरातील चरबी वाढणे, व्हिसेरल फॅट वाढणे आणि फॅटी लिव्हर यांचा समावेश आहे.