अंजीर पाणी पिण्याने नक्की काय फायदे मिळतात
सकाळची निरोगी सुरुवात तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. असे बरेच पदार्थ आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. तुमचे आरोग्य या पदार्थांच्या सेवनाने सुधारू शकते. अंजीरदेखील त्यापैकी एक आहे.
जर तुम्ही रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायलात किंवा तुम्ही रिकाम्या पोटी अंजीर खात दिवसाची सुरूवात केली तर तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतील. अनेक डॉक्टरही रोज 2 भिजवलेले अंजीर खाण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या अंजीरचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे (फोटो सौजन्य – iStock)
फायबरचा उत्तम स्रोत
अंजीर खाण्याचे नक्की फायदे काय आहेत
अंजीरच्या पाण्यात भरपूर फायबर असून याला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर जे पचनसंस्थेसाठी चांगले ठरते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. तसंच फायबर जास्त प्रमाणात असल्याने तुम्हाला भूक लवकर लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्याचे कामही अंजीर चांगले करते.
हृदय राहते चांगले
हृदय भक्कम करण्यासाठी अंजीर
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायले तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. अंजीर हे फायबर आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर अधिक चांगल्या पद्धतीने निरोगी राहण्यास मदत मिळते.
वजन नियंत्रणासाठी
वजन राहते नियंत्रणात
ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे अथवा वजनाचे व्यवस्थापन करायचे आहे त्यांच्यासाठी अंजीरचे पाणी खूप फायदेशीर ठरते. हे तुमचे चयापचय वाढवेल, जे वजन कमी करण्यास मदत करेल. तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात अंजीर पाण्याचा समावेश करून घ्या
मधुमेहाची पातळी
पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर रक्तातील साखरेची पातळी राखण्यासही मदत करते. असे मानले जाते की अंजीरचे पाणी प्यायल्याने टाइप-2 मधुमेहामध्ये ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्मूदी किंवा सॅलडमध्ये अंजीरही घालू शकता. अंजीरचे सेवन नियमित करणे मधुमेही रूग्णांसाठी अत्यंत उपयोगी ठरते असे डॉक्टरही सांगतात.
हेदेखील वाचा – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित खा १ अंजीर, जाणून घ्या फायदे
पुरुषांचा स्टॅमिना
पुरूषांचा स्टॅमिना वाढविण्यासाठीही अंजीर उपयोगी
याशिवाय ज्या पुरूषांना आपल्या शरीराचा स्टॅमिना वाढवायचा आहे, त्यांनी नियमितपणे पाण्याचे भिजवलेले अंजीर खावे अथवा अंजीराचे पाणी अशा पुरुषांनी नियमित पिण्याची सवय लाऊन घ्यावी. आठवड्याभरात पुरुषांमधील स्टॅमिना यामुळे नक्कीच वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय दिवसभर एनर्जी राहण्यास मदत मिळते.