Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या पाण्याचे महत्व आणि पाणी पिण्याचे फायदे

दिवसभरात किती प्रमाणात पाणी प्यायला हवे? जेणेकरून शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही आणि वारंवार पाणी पिण्याची समस्याही उद्भवणार नाही. शरीर हायड्रेट राहण्यास दिवसभरात तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे म्हटलं जातं. शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 15, 2022 | 11:17 AM
जाणून घ्या पाण्याचे महत्व आणि पाणी पिण्याचे फायदे
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. आठ ग्लास पाण्यामागील नेमके गणित काय आहे, ते जाणून घेऊया. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात जवळपास आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, हे आपल्यापैकी बहुतांश जणांनी ऐकलं असेलच. पण सामान्य वातावरणात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जितकी तहान लागलेली असते, त्यानं तितकंच पाणी प्यावे. तर काही लोकांच्या शरीराला तहानेच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. कारण व्यक्तीच्या शरीररचनेनुसार पाणी पिण्याची गरज वेगवेगळी असते. कारण यावर आरोग्याशी संबंधित अन्य घटकही अवलंबून असतात.

पाण्याचे महत्व

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.
५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
६) B. P. संतुलित राहतो.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
१६) जेवणापूर्वी आर्धा तास आधी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते. पचन व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर एका तासाने पाणी प्यावे.
१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.
१९) जेवणानंतर एका तासांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.
२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
२१) तहान लागली की पाणी प्यावेच.
२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.
२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.
२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.
२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.
२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.
२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२८) जेवढी तहान तेवढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

Web Title: Learn the importance of water and the benefits of drinking water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2022 | 11:17 AM

Topics:  

  • Aarogya Mantra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.