
बॉलीवुडची दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत राहते. सध्या ती प्रियकर अभिनेता इकबालशी लग्न करणार असल्याने चर्चेत आहे. अभिनेत्री कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते.
ओव्हरवेट असुनही तिचे लूक तिच्या बॉडी टाईपनुसार परफेक्ट असतात. ती कोणत्याही प्रकारचे ड्रेसिंग करु देत तिचे पोट कधीच दिसत नाही. वेस्टर्न असो किंवा इंडियन ती प्रत्येक लूकमध्ये खुलून दिलते. अनेक भारतीय महिलांना पोट दिसण्याच्या समस्येमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे मनाप्रमाणे कपडे परिधान करता येत नाहीत. पण काही हरकत नाही जर तुमचा बॉडी टाईप ब्रॉड असेल तर तुम्ही सोनाक्षी सिन्हाला फॉलो करु शकता. तिच्या युनिक फॅशन स्टाईल जाणून घेऊ शकता.
तुम्हाला लग्नकार्यात संगीत फंक्शनसाठी लूक करायचा असेल तर सोनाक्षीचा ब्लिंक स्टाईलीश ब्लेजर आणि घेरदार प्लाजो लूक पहा. तशा पद्धतीने तुमच्या आवडीच्या रंगाचा लूक तुम्ही करा. डान्स करताना तुमचे पोटही दिसणार नाही.
वेस्टर्न लूक करताना ती कॉनट्रास्ट रंग पद्धतीचा वापर करते. उदाहरण म्हणून तुम्ही तिचा काळ्या रंगाचा ब्लेजर, ट्राऊझर व त्यावर पांढऱ्या रंगाचे जॅकेट असलेल्या लूक पाहा. क्रॉप टॉपमधील तिचा लूकही अगदी हटके आहे. ओव्हरवेट असूनही हटके आणि युनीक स्टाईल कशी करावी यासाठी सोनाक्षी सिन्हाचे लूक तुम्ही नक्की फॉलो करु शकता.