
साहित्य :
तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. कुकरमध्ये अडीच पट पाणी घालून मऊसर भात करून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १ पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका. तयार भात घोटून घ्या. आटवलेल्या दुधात भात मिस्क करा. हे मिश्रण ४-५ मिनिटे उकळत ठेवा. त्यात चवीनुसार साखर घाला.
चवीसाठी बदाम आणि बेदाणे घाला आणि एकीकडे सतत ढवळत रहा. वेलची पूड आणि केशर घातलेले दुध घालून ५ – ६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे त्यात साय येणार नाही. खीर थोडी थंड झाली कि सर्व्ह करा.