थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बाजरीच्या पिठाचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाजरी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा
थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा
Published on: 
Updated on: 

थंडीत शरीराला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे रोजच्या आहारात अनेक उष्ण पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उष्ण पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि आजारांपासून शरीराचा बचाव होतो. थंडीत साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे नाश्त्यात किंवा जेवणात विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टीक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पिठापासून गोड हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठ खाल्ले असेल. बाजरीमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. नियमित बाजरीचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया मजबूत राहील, शरीरात कायम उष्णता टिकून राहील आणि आरोग्याला भरमसाट फायदे होतील. हिवाळ्यात आहारामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी धान्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया बाजरीचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साहित्य:

  • बाजरीचे पीठ
  • तूप
  • सुका मेवा
  • गूळ
  • सुका मेवा
  • सुंठ पावडर
  • वेलची पावडर

कृती:

  • बाजरीच्या पिठाचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात वाटीभर बाजरीचे पीठ घालून मंद आचेवर खमंग भाजा.
  • पीठ भाजल्यानंतर त्यात गरम पाणी घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • पिठाचा रंग बदल्यानंतर त्यात गूळ, सुठ पावडर घालून चमच्याने सतत ढवळत राहा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात तूप सुद्धा घालू शकता. यामुळे पदार्थ कढईला चिकटणार नाही.
  • गूळ पूर्णपणे वितळाल्यानंतर त्यात सुका मेवा, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बाजरीच्या पिठाचा खमंग हलवा.