१० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप
हिवाळ्यात थंडीच्या गारव्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते. वारंवार सर्दी, खोकला, थंडी, ताप इत्यादी अनेक समस्या उद्भवून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात गाजर टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने टोमॅटो सूप बनवून प्यायले जाते. टोमॅटो सूप प्यायल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि आरोग्य बिघडत नाही. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट गोड चवीचा टोमॅटो शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. यासोबतच यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत. गाजर आणि टोमॅटोमध्ये विटामिन ए भरपूर असते. चला तर जाणून घेऊया गाजर टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी






