होममेड बॉडी लोशन बनवण्याची पद्धत
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातवरणात गारवा असतो. थंडी वाढल्यानंतर आद्र्रता सुद्धा वाढू लागते. या दिवसांमध्ये वातावरणात कोरडेपणा असतो. यामुळे त्वचासुद्धा काही प्रमाणात कोरडी होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्वचेवर खाज येते, त्वचा लाल होणे, हातापायांची चामडी निघून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेकदा त्वचा कोरडी झाल्यानंतर संपूर्ण शरीराला सतत खाज येऊ लागते, ज्यामुळे चेहऱ्यावर रॅश येतात. सर्वच ऋतूंमध्ये त्वचेच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, ज्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरावरची त्वचा कोरडी पडल्यानंतर अनेकदा बॉडी लोशन लावले जाते. बाजारात मिळणारे केमिकलयुक्त बॉडी लोशन लावले जाते. केमिकल युक्त प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थ वापरून तयार केलेले बॉडी लोशन त्वचेवर लावावे. यामुळे त्वचा मऊ आणि नितळ होण्यास मदत होईल. चला तयार पाहुयात होममेड बॉडी लोशन बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: पित्ताची वाढ झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच लक्ष देऊन त्वचेच्या घ्या काळजी
हे देखील वाचा: रांगोळीचे रंगीत डाग क्षणार्धात फरशीवर नाहीसे होतील, पुसण्यापूर्वी या 3 गोष्टी मिसळा पाण्यात
हिवाळ्यामध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. कोरड्या त्वचेवर मेकअप केल्यानंतर सुद्धा मेकअप जास्त वेळ त्वचेवर टिकून राहत नाही. त्यामुळे कोरड्या त्वचेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित रात्री झोपताना त्वचेवर बॉडी लोशन लावावे. जेणेकरून त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होईल. कोरफड जेल त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. विटामिन ई च्या कॅप्सूलमध्ये अनेक पोषक आणि त्वचेला आवश्यक असलेले गुणधर्म आढळून येतात.