पित्ताची वाढ झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात 'या' गंभीर समस्या
सर्वच महिला पुरुषांना त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात तर काही महिला घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करून पाहतात. पण त्वचेच्या प्रकारानुसार तुमच्या त्वचेला नेमकं काय सूट होईल याचा विचार करून चेहऱ्यावर प्रॉडक्ट किंवा घरगुती पदार्थ लावावेत. आयुर्वेदातील तीन दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ. हे तिन्ही दोष शरीरात एकाचवेळी वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरात पित्ताची वाढ होणे, सतत अपचनाची समस्या उद्भवणे, कफ वाढणे, तणाव वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पित्ताची वाढ झाल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केरळच्या डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा! कच्चे दूध आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या सविस्तर
शरीरात पित्ताची वाढ झाल्यानंतर त्वचेमधील ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडू लागते. कोरडी त्वचा झाल्यानंतर कितीही काही केले तरीसुद्धा त्वचा लवकर व्यवस्थित होत नाही. त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात झाल्यास शरीरात पित्ताची वाढ होऊ लागते. पित्ताची पातळी वाढून कोरडेपणा वाढू लागतो.
पित्त दोष शरीरात निर्माण झाल्यानंतर त्वचेवर सूज येते. त्वचा लाल होऊन चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर लाल दादी येऊ लागतात.पित्त वाढू लागल्यानंतर त्वचा लाल होऊन जाते. काहीकाळ त्वचा व्यवस्थित होते पण कालांतराने पुन्हा एकदा चेहऱ्याला सूज येते. त्यामुळे शरीरातील पित्त कमी करण्यासाठी दही आणि थंड पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात पित्त दोष वाढल्यानंतर त्वचेला जास्त खाज सुटते. पित्ताची पातळी वाढल्यानंतर एटोपिक लेयर किंवा त्वचेच्या वरच्या थराला सूज येते. ज्यामुळे सतत त्वचेमध्ये जळजळ होऊ लागते. शरीरातील पित्ताचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थ, जिऱ्याचा पाण्याचे, ताक, दही, लिंबू सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: सतत आजारी पडता? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत
शरीरात पित्ताची पातळी वाढल्यानंतर आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थ खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित शरीराला पचेल असा संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नेहमी ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. रोजच्या आहारात शेंगदाणे, मिरची आणि आंबट पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पित्त दोष वाढतो.