फोटो सौजन्य - Social Media
आजच्या वेगवान जीवनशैलीत पुरुषांमध्ये कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत चालला आहे. जगभरात दरवर्षी लाखो पुरुष आणि महिला कॅन्सरला बळी पडतात, मात्र पुरुषांचा मृत्यूदर जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या धोक्यामागील प्रमुख कारण म्हणजे उशिरा निदान होणे. ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. हरीश वर्मा यांनी नुकत्याच सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात महत्त्वपूर्ण निरीक्षणे मांडली आहेत.
त्यांच्या मते, स्त्रिया नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे जातात, कारण त्यांना गाइनॅकॉलॉजिकल तपासण्या कराव्याच लागतात. परंतु पुरुष बहुतांश वेळा गंभीर त्रास जाणवला कीच डॉक्टरकडे धाव घेतात. यामुळे आजार उशीरा सापडतो आणि उपचार गुंतागुंतीचे होतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या एका सर्वेक्षणानुसार ४४% पुरुष केवळ ‘अत्यावश्यक’ असले कीच डॉक्टरकडे जातात.
तज्ज्ञांच्या मते, पुरुष लक्षणांकडेही दुर्लक्ष करतात. अचानक वजन घटणे, गाठ किंवा सूज येणे, सतत थकवा, पचन किंवा लघवीतील बदल ही कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. परंतु अनेक जण त्यांना किरकोळ समजून पुढे ढकलतात. याशिवाय समाजातील धारणा देखील मोठी समस्या आहे. ‘पुरुषांनी त्रास सहन करावा’, ‘कमजोरी दाखवू नये’ अशी मानसिकता अजूनही पक्की आहे. परिणामी, पुरुष वेदना किंवा अडचणींवर दुर्लक्ष करतात आणि आजार अधिक गंभीर होतो.
आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या सवयी पुरुषांमध्ये प्रमाणाबाहेर दिसतात. धूम्रपान, मद्यपान, जंकफूड, लाल मांसाचे जास्त सेवन, उशिरापर्यंत जागरण आणि व्यायामाचा अभाव या सर्वांमुळे फुफ्फुस, यकृत, घसा, कोलन आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच शरीरातील इन्सुलिन रेसिस्टन्स, हार्मोन्समधील असंतुलन व सूज याकडेही वेळेत लक्ष दिले जात नाही.
आरोग्य टिकवण्यासाठी काय करावे?
डॉ. वर्मा यांचे काही महत्त्वाचे सल्ले
डॉ. वर्मा स्पष्टपणे सांगतात की, वेळीच केलेली तपासणी व उपचार अनेकांचे जीव वाचवू शकतात. आरोग्याची काळजी घेणे ही कमजोरी नसून शहाणपणाचे लक्षण आहे.