Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानच्या पर्यटनाचा आधार अर्थात मिनीट्रेन

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये जाण्यासाठी प्रत्येक पर्यटकाला आतेथे नॅरोगेजवर चालणाऱ्या मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते. या घुमघुन गाडीचे आकर्षण हे लहानापासून मोठे अशा सर्वांना असून नेरळ-माथेरान-नेरळ या शतक महोत्सव पूर्ण करणाऱ्या मिनीट्रेनला जागतिक हेरिटेज ट्रेनमध्ये समावेश व्हावा. यासाठी मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाचे सुरु असलेले प्रयत्न या ट्रेनचे ऐतिहासिक अस्तित्व यांचे जतन करण्याचा प्रयत्न आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Jun 03, 2022 | 05:22 PM
माथेरानच्या पर्यटनाचा आधार अर्थात मिनीट्रेन
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : १८५० मध्ये ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावला. १९०७ मध्ये आदमजी पिरभोय यांनी नेरळ-माथेरान असा रेल्वे मार्ग शोधून काढlला आणि पहिल्यांदा माथेरान हे कोणत्या तरी वाहनांच्या मार्गाने जोडले गेले. त्याआधी माथेरानला जाण्यासाठी पायी किंवा घोड्यावर जावे लागत असे. मुंबईमधील काही गिरण्यांचे मालक असलेले पिरभोय यांना माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर घोडा मिळाला नाही. म्हणून त्यांनी त्यावेळी १७ लाख रुपये खर्चून रेल्वेमार्ग शोधून काढून तो २१ किलोमीटरचा मार्ग नेरळ-माथेरान मिनीट्रेन १९०७ मध्ये सुरू झाली. नेरळ-माथेरान हा मार्ग शोधून काढल्याने ब्रिटिश सरकारने आदमजी पीरभॉय यांना सर ही पदवी दिली.

कोळशापासून वाफ निर्माण करणारी इंजिन

त्यावेळी ही ट्रेन कोळशापासून तयार होणाऱ्या वाफेवर चालायची. १९१४ मध्ये कोळशापासून आग निर्माण करणारी इंजिने ब्रिटिशांनी जर्मनीमध्ये तयार करायला लावली. त्यावेळी माथेरान मिनीट्रेन शिवाय, दार्जिलिंग येथील मिनीट्रेनसाठी देखील अशीच इंजिने आवश्यक असल्याने त्यांची निर्मिती करण्यात आली. १९१७ मध्ये नेरळ-माथेरान मिनीट्रेन नॅरोगेज मार्गासाठी तीन इंजिन आणले गेले. त्यातील एनडीएम ७९४ बी हे इंजिन आजही नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या सेवेत असून अन्य दोन इंजिन आज रेल्वे प्रशासनाने हेरिटेज ठेवा म्हणून जतन करण्याचा निर्णय घेऊन माथेरान रेल्वे स्थानक आणि नवी दिल्ली येथील रेल भवन येथे उभी करून ठेवली आहेत. सध्या नेरळ लोको येथे असलेले कोळशावर चालणारे इंजिन आपली शतक महोत्सवी परंपरा निर्माण करून सेवेत कायम आहे.

पर्यटकांच्या सोयीसाठी विविध कामे

नेरळ-माथेरान मार्गावर नॅरोगेज ट्रॅक, तेथील स्थानके यांचे पर्यटकांना आकर्षण व्हावे यासाठी स्थानके देखील सुशोभित केली जात आहेत. नेरळ, जुम्मापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज आणि माथेरान स्थानकात प्रवासी, पर्यटकांच्या सोयीसाठी विविध कामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यात रंगरंगोटी, बैठक व्यवस्था, बगीचा, किरकोळ दुरुस्तीची कामे यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात वॉटर पाईप येथे निवारा शेड, पाणपोई यांची व्यवस्था नव्याने केली जात असून जुम्मापट्टी स्थानकात गार्डन विकसित केले जात आहे. नेरळ स्थानकात सर्व चारही फलाट यांची उंची वाढविण्यात येत असून आकर्षक रंगसंगती यांची कामे मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी चारही स्थानकात करणार आहेत.

मिनीट्रेन नसल्याने विदेशी पर्यटक दुर्मिळ

सध्या माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून जाणारी मिनिट्रेन या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्यात गेल्या काही वर्षांपासून नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन सेवेचे ऑनलाईन तिकीट बंद आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक मागील काही वर्षात माथेरानकडे फिरकत नाहीत. त्यात माथेरानचे पर्यटन आणि मिनीट्रेन हे समीकरण अनेक दशके सुरू आहे. त्यामुळे मिनिट्रेन सुरूच राहावी हे माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Web Title: Minitrain is the main tourist attraction of matheran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2022 | 05:22 PM

Topics:  

  • Tourist Place

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.