फास्ट फूड ठरेल कॅन्सरचे कारण (फोटो सौजन्य: istock)
पिझ्झा, बर्गर, मोमो यासारखे फास्ट फूड आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि त्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकार देखील होऊ शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे की पिझ्झा, बर्गर, मोमोज यांसारखे फास्ट फूड खाल्ल्याने 50 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये पचन कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
अलीकडेच, ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स विद्यापीठात रेड मीट, प्रोसेस मीट, फास्ट फूड, शुगर ड्रिंक्स आणि अल्कोहोल यासारख्या अनारोग्य पदार्थांच्या अतिसेवनाच्या दुष्परिणामांवर संशोधन केले गेले, ज्यामध्ये असे आढळून आले की या गोष्टींचे सेवन केल्याने गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
विशेषत: पिझ्झा, बर्गर, मोमोज यांसारखे फास्ट फूड खाल्ल्याने शरीरात जळजळ वाढते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
जे लोक त्यांच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, फॅटी फिश, बीन्स आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते.