Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपंचमीच्या सणाला बनवा पौष्टिक चवदार गव्हाची खीर, वाचा सोपी रेसिपी

नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. तसेच अनेक महिला उपवास सुद्धा करतात. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळीच लगबग असते. सर्व महिला नटूनथटून श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिव मूठ वाहण्यासाठी शंकराच्या मंदिरात जातात. तसेच नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड, गव्हाची खीर, पातोळ्या इत्यादी गोडाचे अनेक पदार्थ बनवले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2024 | 03:45 PM
नागपंचमीला बनवा पौष्टिक गव्हाची खीर

नागपंचमीला बनवा पौष्टिक गव्हाची खीर

Follow Us
Close
Follow Us:

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. यंदाच्या वर्षी 9 ऑगस्टला नागपंचमी आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. तसेच अनेक महिला उपवास सुद्धा करतात. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळीच लगबग असते. सर्व महिला नटूनथटून श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिव मूठ वाहण्यासाठी शंकराच्या मंदिरात जातात. तसेच नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड, गव्हाची खीर, पातोळ्या इत्यादी गोडाचे अनेक पदार्थ बनवले जातात. बदलत्या ऋतूनुसार आहारात सुद्धा बदल केला जातो. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर बनवली जाते. गव्हाची खीर हा पारंपरिक पदार्थ असून गाव खेड्यात सर्वच ठिकाणी बनवला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गव्हाची खीर कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत. यंदाच्या नागपंचमीला गव्हाची खीर नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • एक वाटी गहू
  • दूध
  • वेलची पावडर
  • काजू, बदाम
  • मनुका
  • गूळ
  • तूप

हे देखील वाचा: नागपंचमीला बनवा खास कोकणी हळदीच्या पानातील पातोळ्या, रेसिपी आहे सोपी

कृती:

  • गव्हाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम गहू पाखडून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर रात्रभर पाण्यात गहू भिजत ठेवा.
  • रात्रभर गहू भिजवून ठेवल्यानंतर कुकरमध्ये गहू टाकून त्यात 3 ग्लास पाणी टाकून 7 ते 8 शिट्टया काढून घ्या.
  • गहू व्यवस्थित शिजल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्या किंवा रवीच्या सहाय्याने फेटून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप टाकून गरम करून घ्या. गरम तुपात सुका मेवा परतून घ्या.
  • नंतर त्यात बारीक करून घेतलेले गहू टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. गहू शिजल्यानंतर त्यात अर्धा वाटी गूळ टाकून मिक्स करा.
  • गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि काजू बदाम टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • खीर शिजताना पाणी टाका. पाणी टाकून खीर व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करून घ्या.
  • खीर थंड झाल्यानंतर त्यात दूध घालून मिक्स करा.

Web Title: Nagpanchami make nutritious and tasty wheat pudding on the festival of nagpanchami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • Nag Panchami 2024
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा, ५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
1

लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा, ५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ
2

साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ

पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
3

पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड, नोट घ्या रेसिपी
4

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड, नोट घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.