हौसेला मोल नाही! पद्मश्री राहीबाईंनी भावासाठी बनवली 'बीज राखी'

rakhi
Published on: 
Updated on: 

अकोले तालुक्यातल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (Padmashri Rahibai )यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी ( Seed Rakhi ) बनवली. एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे.

पद्मश्री राहीबाईंची (Padmashri Rahibai )बीज राखीगावरान बिया वापरून बनवली राखी - भात, नागली, वरई, काकडी, भोपळा (Rice, Nagli, Varai, Cucumber, Pumpkin) यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. भाजप जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या (seed bank) रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे.

राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. बीज (seed) राख्यांची विशेष मोहीम हि भावासाठी राबवली गेली, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम (love) आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.