शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक हे उमेदवार असतील असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.
तासगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार रणशिंग फुंकले आहे. लकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तासगाव शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
भारतीय जनता पक्षाची दिवसागणिक वाढत असलेली ताकद हा अनेक नतद्रष्टांसाठी असूयेचा विषय आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पक्ष बळकटीसाठी नुतन पदाधिकार्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये वाकयुद्ध सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टातील सगळ्या याचिका संपल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Gautami Patil Car Accident : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटली एका अपघातामुळे चर्चेत आली. पुण्यात झालेल्या अपघातानंतर आता गौतमीला थेट अटक करण्याची मागणी केली जात असून हे प्रकरण चांगलचं तापलं आहे.
सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट देऊन सर्व डिपार्टमेंट्स आणि विद्यार्थीकक्षांचे निरीक्षण केले.
राज्यात सहाय्यक प्राध्यापकांच्या हजारो पदे रिक्त असताना शासनाकडून केवळ तात्पुरते उपाय केले जात आहेत. ३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ३ हजार ५८० सहाय्यक प्राध्यापकांच्या जागांना मान्यता देण्यात आली होती.
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे.