
शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी सूप
शेवग्याच्या शेंगच नाही तर त्याची पाने, फुले यांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवग्याचे अनेक गुणधर्म आहेत. यांच्या भाजी, पाना, फुलांपासून भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि पोषकत्त्वे मिळतात. शेवग्याची, पानांची फुलांची भाजी तुम्ही खाल्ली असेल. पण शेवग्याचे सूप तुम्ही कधी पिले आहे का? नसेल तर नक्कीच ट्राय करा. त्याचेही खूप फायदे आहेत. हे फायदे आपण आज जाणून घेणार आहोत. यासोबतच आपण सूप कसे बनवायचे हेही जाणून घेणार आहोत.
शेवग्याच्या शेंगाचे सूपाचे फायदे
शेवग्याच्या शेंगाचे सूप शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. यामुळे शरीरातील आतड्या साफ होतात लिव्हर, किडनी आतून स्वच्छ राहतात.
यामधील ‘व्हिटॅमिन- सी’मुळे कोणत्याही इनफेक्शन आणि आजारांपासून तुम्ही दूर राहाल. तसेच शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढतील. यामुळे सर्दी खोकला ताप या समस्या उद्भवणार नाही.
शरीरातील पोषकत्त्वे कमी झाली असल्यास ते भरून काढण्यास शेंगाचे सूप तुम्ही पिऊ शकता. यातील बीटा कॅरोटीन आणि ‘व्हिटॅमिन सी’मुळे इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत होते.
सांधेदुखी, गुडघेदुखीने त्रस्त असाल तर शेवग्याच्या शंगाचे सूप नक्की प्या. यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्यामुळे हाडे बळकट राहतात.
शेवग्याच्या शेंगामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रीत राहते. हृदयविकाराचा धोकाही टळतो.
चला आता शेवग्याच्या शेंगांच्या सूपाची रेसिपी नोट करुन घेऊ.
सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कृती
अशा रीतीने तुमचे शेवग्याच्या शेंगाचे सुप तयार होईल. जे शरीरासाठी अत्यंत पौष्टीक आणि लाभदायी ठरेल. ज्यामुळे शरीरात लोहाची कमी पडणार नाही. अनेक आजारांची संभावना टळेल.