साहित्य - तेल - अर्धी वाटी मेथ्या १ चमचा मोहरी - १ चमचा बडिशोप - १ चमचा कलौंजी - १ चमचा कडीपत्ता - ८ ते १० पाने लाल मिरच्या - ५ ते ६ लसूण पाकळ्या - २० ते २५ हळद - १ चमचा लाल तिखट - अर्धा चमचा व्हिनेगर - पाव वाटी मीठ - चवीपुरते कृती - पॅनमध्ये तेल चांगले गरम करुन घ्यावे. यामध्ये मेथ्याचे दाणे टाकून ते थोडे लालसर होऊ द्यावेत. त्यामध्ये मोहरी आणि कलौंजी घालून फोडणी तडतडू द्यावी. यामध्ये लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालावा, यामुळे लोणच्याला एकप्रकारचा चांगला स्वाद येतो. मग यामध्ये लसूण पाकळ्या घालून हे सगळे एकजीव करुन घ्यावे. नंतर यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालावे. व्हिनेगर घालून साधारण २ मिनीटे सगळे शिजू द्यावे. गार झाल्यावर हे लोणचे एका बाऊलमध्ये काढून ठेवावे.