जायफळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त
स्वयंपाकघरामध्ये पदार्थ करताना जायफळ हे असतेच, यांचा वापर गोडपदार्थ करण्यासाठी विशेष केला जाते, पदार्थ व्यतिरिक्त शरीरातील मोठ्या समस्याचे प्रश्न जायफळने दूर होऊ शकते. जायफळला आयुर्वेदात खुप महत्त्व आहे. पोटाच्या तक्रारी , त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी जायफळचा लाभ होतो.
आपल्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या सुरकुत्यांनी चिंताग्रस्त असाल. यासाठी जायफळ उपयोगी आहे. जायफळ उगाळून त्याची पेस्ट एक महिना चेहऱ्याला लावल्यास सुरकुत्या निघून जातात. शिवाय चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळी यांचे चेहऱ्यावर पडणारे डाग घालवण्यासाठी याचा उपयोग होतो.
जायफळने मालिश केल्यास रक्तप्रवाह पद्धतीने योग्य पध्द्तीने होतो. शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहिल्यास झोप चांगली लागते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. याशिवाय रोज रात्री दुधातून जायफळाची पूड घातल्यास झोप चांगली लागते.
दातांसाठी जायफळाचे तेल खूप फायदेशीर ठरते. दातदुखत असतील कापसावर तेल घेऊन दातांच्या मुळाशी लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते.
लहान मुलांना दूध पचायला जड जाते. अशा वेळी अर्ध दूध व अर्धे पाणी त्यात एक जायफळ टाकून उकळून असे करून पाजल्यास मुलांना दूध पचते.
जायफळामुळे वेदना कमी होण्यास मदत करते. त्यामुळे पोटदुखी आणि सूज येणे या दोन्हीसाठी जायफळचा वापर केला जातो.सांधेदुखी, स्थानूंमध्ये वेदना, गाठी, जखमा या सारख्या अनेक आजारासाठी जायफळ हे गुणकारी आहे.
पचनासंस्थेशी निगडीत काही त्रास होत असेल उदा. जुलाब, सूज येणे, गॅस होणे यासारख्या समस्या आजारावर जायफळ फायदेशीर आहे. पोट दुखीची समस्या दूर होते, तसेच भुक न लागण्याची समस्या जायफळचे सेवन केल्याने दूर होते.
जायफळाचा वापर पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातोच, शिवाय त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. जायफळात खनिजे आहेत. त्याव्यतिरिक्त पोटॅशिअम, लोह आणि मॅग्नेशिअम हे सर्व धातु शरीरासाठी पोषक असतात.
जायफळ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. आहार, प्रदूषण, तणाव, तंबाखू सेवन तसेच काही औषधांमध्ये विषाक्त पदार्थ असतात.