ओव्हरियन कॅन्सर आणि प्रजनन क्षमतेचा संबंध (फोटो सौजन्य - iStock)
ओवेरियन कॅन्सर (अंडाशयाचा कर्करोग) ज्यामध्ये होतो ते अंडाशय प्रजनन संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स (रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स) आणि गेमेट्स (जीवाच्या पुनरुत्पादक पेशी) यांचे उत्पादन करते. बहुतांश भारतीय महिलांना मध्यम किंवा उतार वयात येईपर्यंत या आजाराची काळजी करण्याची गरज भासत नाही कारण सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची काहीच लक्षणे समजून येत नाहीत.
तुलनेने खूप पुढच्या टप्प्यात जरी या आजाराचे निदान केले जात असले तरी, अनेक कॅन्सर रुग्णांना अनुभवायला लागणारे उपचारांशी संबंधित ट्रॉमा दूर करण्यासाठी सर्व्हायव्हरशिप केयर डिझाईन करण्यात आली आहे. मानसिक, सामाजिक साहाय्य पुरवण्याबरोबरीनेच आजारातून बरे झाल्यानंतरच्या काळात जीवन गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात – खासकरून युवा महिलांसाठी प्रजननक्षमता खूप महत्त्वाची असते. डॉ. रेणुका बोरिसा, कन्सल्टंन्ट, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
प्रजनन क्षमता कशी टिकेल
प्रजनन क्षमतेविषयी माहिती
ओवेरियन कॅन्सर जर प्रजननक्षम वयामध्ये होत असेल तर त्याचे परिणाम आर्थिक ओझ्यापेक्षा खूप जास्त असतात. स्वतःचे मूल हवे ही तीव्र इच्छा चिंता निर्माण करते, सर्जरी, केमोथेरपी आणि हिस्टेरेक्टॉमी यासारख्या उपचारांमुळे शरीरामध्ये कायमस्वरूपी बदल होऊ शकतात. अशावेळी भावना खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात. सुदैवाने युनिलॅटरल ओफोरेक्टॉमी किंवा ज्यामुळे प्रजननक्षमतेला नुकसान पोहोचवणार नाहीत अशा सर्जरी करून प्रजननक्षमता टिकवून ठेवणे शक्य आहे. तरी प्रजननामध्ये साहाय्य आवश्यक ठरू शकते.
काय आहेत आव्हानं
ही आव्हाने भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची असतात आणि आईची भूमिका व आयुष्याचे नियोजन यांच्याशी संबंधित सामाजिक तणावांमुळे ती अजून जास्त कठोर होऊ शकतात. खासकरून जर महिला पालकत्वासाठी तयार नसेल किंवा सक्षम नसेल तर कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे तिला सहन करावे लागू शकते.
40 टक्के होईल कॅन्सरचा धोका कमी, करा 5 कामं आणि रहा बिनधास्त!
प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी पर्याय
ओवेरियन कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे त्यानुसार उपचार पर्याय निवडला जातो. जर आजार खूप आधी लक्षात आला तर कमी वयाच्या महिलांसाठी प्रजनन क्षमता टिकवून ठेवू शकतील अशा उपचारांमध्ये ओवरीचा प्रभावित भाग तेवढाच काढून टाकून, गर्भाशय आणि उर्वरित ओवरी तशीच ठेवली जाऊ शकते. यामुळे भविष्यात गर्भधारणा होण्याची क्षमता टिकून राहते.
कसा करावा प्रिझर्व्हेशन प्लॅन
कसे प्रिझर्व्ह करावे
उपचार सुरु करण्याच्या आधी फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रिझर्वेशन प्लॅन तयार करता येतो, यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:
ओवेरियन कॅन्सरनंतर गर्भधारणा
ओवेरियन कॅन्सरचे निदान आणि उपचारांनंतर गर्भधारणा करणे शक्य असते, जर कॅन्सर खूप आधी लक्षात आला तर ही शक्यता वाढते. जर एक ओवरी आणि गर्भाशय जसेच्या तसे असेल तर गर्भधारणा करणे शक्य आहे. पण तरी महिलांना गर्भधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यापूर्वी सुरक्षित कालावधीपुरते थांबण्याचा सल्ला दिला जातो, हा कालावधी उपचारांनंतर ६ महिने ते २ वर्षे असू शकतो, कॅन्सरचा प्रकार आणि टप्पा कोणता आहे त्यावर हे अवलंबून असते. ज्या महिलांना स्वतः गरोदर राहणे शक्य नाही किंवा ज्यांची तशी इच्छा नाही, अशा महिला सरोगसीचा पर्याय स्वीकारू शकतात.
भावनिक साहाय्य
प्रेगन्सी कशी होईल
कॅन्सर आणि संभाव्य वंध्यत्व असे दुप्पट ओझे सहन करणे खूप जिकिरीचे असते. कौन्सेलिंग, थेरपी सेशन किंवा रुग्ण सहायता गटांमार्फत भावनिक साहाय्य पुरवणे आवश्यक असते. आरोग्य देखभाल सेवासुविधा पुरवणाऱ्यांसोबत भविष्यातील कुटुंब नियोजनाबद्दल खुला संवाद साधल्यास महिलांना कठीण काळातदेखील जाणकार निर्णय घेता येऊ शकतात.
ओवेरियन कॅन्सरचे निदान हे महिलेच्या आयुष्यातील एक खूप गंभीर आव्हान ठरू शकते, पण हा आजार म्हणजे तिची प्रजननक्षमता समाप्त असा अर्थ होत नाही. आजार खूप प्राथमिक टप्प्यात असताना निदान, त्यावर वेळीच योग्य ते उपचार आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्याच्या आधुनिक तंत्रांचा उपयोग करून अनेक महिला मातृत्वाचे स्वप्न साकार करू शकतात. या पर्यायांविषयी जागरूकता वाढवणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिला निरोगी आणि आशा व अमर्याद संधींनी परिपूर्ण आयुष्य मिळवू शकतील.