कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी
वैद्यकीय शास्त्राने कर्करोग दूर करण्याचे अनेक मार्ग शोधून काढले असले तरी कर्करोग हा आजही सर्वात प्राणघातक आजार आहे. सध्या तर अनेक जणांना कॅन्सरने ग्रासल्याचे ऐकू येते आणि त्यावर उपाय त्वरीत करावे लागतात हे वेगळे सांगायला नको. इतकंच नाही तर कर्करोगाचे 200 हून अधिक प्रकार आहेत, ज्यापैकी अनेक अद्याप बरे झालेले नाहीत. अशा परिस्थितीत, कॅन्सरचा प्रतिबंध करणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
अलीकडे, अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केलेल्या अभ्यासात काही कारणे सांगण्यात आली आहेत जी काही प्रकारच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात, ज्याचा शोध लावण्यात आला आहे. यामध्ये 18 कॅन्सर आढळले ज्यांचा धोका केवळ जीवनशैलीत काही बदल करून 40 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अभ्यास?
कॅन्सरचा अभ्यास नक्की काय सांगतो
2019 च्या डेटावर आधारित अभ्यासात असे आढळून आले आहे की विशेषत: 30 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये 7,00,000 नवीन कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये आणि 2,62,000 हून अधिक जीवनशैलीचे घटक मृत्यूंशी संबंधित आहेत. हा आकडा निश्चितच कमी नाही. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण अधिक वाढले असल्याचेही दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी
धुम्रपान करू नका
धुम्रपान करणे ठरू शकते घातक
कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये आणि मृत्यूंमध्ये धूम्रपान हा सर्वात मोठा घटक आहे. तथापि, हा एक धोका आहे जो नियंत्रित केला जाऊ शकतो. पण यासोबतच प्रदूषणापासून शक्य तितके दूर राहणेही गरजेचे आहे. अॅक्टिव्ह अथवा पॅसिव्ह दोन्ही प्रकारचे धुम्रपान हे तुम्हाला घातक ठरू शकते हे लक्षात घ्या.
लठ्ठपणा कमी करा
वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे
संशोधकांच्या मते, कर्करोगाच्या सर्व प्रकरणांमध्ये आणि मृत्यूंपैकी सुमारे 7%-8% लठ्ठ लोक आढळतात. अशा परिस्थितीत कर्करोग टाळण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम करणे, चालणे, धावणे यापैकी कोणत्याही गोष्टींना प्राधान्य द्या.
दारू टाळा
दारू पिण्यावर ठेवा नियंत्रण
पुरुषांमध्ये 5.4% आणि स्त्रियांमध्ये 4.1% कॅन्सर मद्यपानामुळे होतात. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की अल्कोहोल केवळ यकृताचेच नव्हे तर संपूर्ण शरीराचे नुकसान करते. हल्ली अल्कोहोल पिण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच कॅन्सरही वाढतोय असे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
निरोगी खाणे महत्वाचे आहे
आहारात योग्य पदार्थ समाविष्ट करा
आहार-संबंधित घटकांपैकी, फळे आणि भाज्या कमी खाल्ल्याने कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू होतात. जर तुम्हाला बाहेरचे खाणे आवडत असेल तर ही सवय तुम्हाला कर्करोगाचे रुग्ण बनवू शकते. जेवणाची वेळ न पाळणे यामुळेही शरीरावर अधिक परिणाम होतोय. ही गोष्ट सर्वप्रथम बदलणे गरजेचे आहे.
सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क
अति सूर्यप्रमकाशात राहू नका
अभ्यासानुसार, यूएसमधील त्वचेच्या मेलेनोमा प्रकरणांपैकी सुमारे 93% आणि मृत्यू हे अतिनील किरणोत्सर्गामुळे होतात. तुम्ही सूर्यप्रकाशात बराच वेळ घालवत असल्यास, थेट संपर्क टाळण्यासाठी तुमचे शरीर कपड्याने चांगले झाका आणि सनस्क्रीन देखील वापरा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.