पॅरेंटिंग टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
आपल्या मुलाने अन्य मुलांसह गर्दीत मिसळण्यापेक्षा ती सोडून यशाच्या मार्गावर पुढे जाताना पाहणे ही प्रत्येक पालकाच्या मनातील इच्छा असते. तुम्हालाही हेच हवे असेल तर तुम्हाला सकारात्मक पालकत्वाबद्दल अर्थात पॉझिटिव्ह पॅरेंटिंगबाबत माहिती असायला हवी. या पालकत्वाच्या शैलीच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवू शकता आणि त्याला मानसिकदृष्ट्या निरोगी बनवू शकता.
पॉझिटिव्ह पॅरेंटिंगमध्ये नेमके काय करावे आणि कशा पद्धतीने आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे याबाबत रिलेशनशिप तज्ज्ञ अजित भिडे यांनी काही मुद्दे सांगितले आहेत. आई-वडिलांनी आपल्या मुलांना नक्की कोणती शिकवण द्यावी हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत.
आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करावे
मुलांशी कसे वागावे (फोटो सौजन्य – iStock)
पालकांच्या लहानशा निष्काळजीपणाचाही मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो. तुमच्या मुलाला इतरांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या पाहिजेत. तुमच्या मुलांना सतत अडवणूक करून तुम्ही जाणूनबुजून किंवा नकळत त्यांचा आत्मविश्वास दुखावत आहात मुळात हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जेव्हाही मूल आपली चूक सुधारेल किंवा त्याच्या चुकीबद्दल माफी मागते तेव्हा त्यांचे कौतुक करायला विसरू नका.
मुलांसाठी वेळ काढणे महत्वाचे
आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी, पालकांनी आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुमच्या मुलासाठी वेळ काढण्याची खात्री तुम्ही करा. अन्यथा एकटेपणामुळे तुमचे मूल अधिक कोषात जाऊ शकते. सकारात्मक पालकत्वानुसार तुम्ही तुमच्या मुलावर तुमची इच्छा लादणे टाळले पाहिजे. त्यांना त्यांचा विचार करून निर्णय घेण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करा.
शांततेने व्यवहार करा
शांततेने करा मुलांसह विचार (फोटो सौजन्य – iStock)
तुमच्या मुलांच्या कमतरतांऐवजी त्यांच्या बलस्थानांवर अधिक लक्ष द्या. वागण्यातील जास्त कडकपणा आपल्या मुलाच्या वाढीस अडथळा आणू शकतो. मुलाच्या यशात पालकांचा मोठा वाटा असतो. सकारात्मक पालकत्वाच्या या अप्रतिम टिप्सचे पालन करून तुम्हीही तुमच्या मुलाचे संगोपन केले, तर तुमचे मूल भविष्यात नक्कीच यश मिळवू शकेल.