
फोटो सौजन्य - Social Media
वर्षांचा अखेर म्हणजे नवीन सुरुवातीची चाहूल! आणि अशा वातावरणात भारतीयांना फिरण्याची एक वेगळीच हौस असते. जर तुमचे कुटुंब तुम्हाला Christmas च्या सुट्टीत कुठे तरी फिरण्यास नेण्यास जिद्द करत आहेत. तर आता टेन्शन नॉट! पण तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे, पण त्यावर आपलीकडे तोडगाही आहे, बरं का? तर वाईट बातमी अशी आहे की परदेशात जाण्याचा विचार असेल तर लक्षात घ्या की विमानाचे दर महागले आहेत पण घरातल्यांना परदेश दौरा करायचा असेल तर आपल्याकडे असे काही देश आहेत जिथे विमान दौरा करणे अगदी देशात विमान दौरा करण्याइतपत स्वस्त आहे. एकंदरीत, प्रवास देशांतर्गत असो वा देशाच्या बाहेर, विमानाचे दर जवळपास सारखेच दिसून येतात. (Places to travel on Chritsmas)
तर कोणत्या देशात करू शकता Christmas ची मज्जा?
व्हिएतनाम, नेपाळ, श्रीलंका, मालदीव यांसारख्या देशांचे चलन स्वस्त असल्याने पर्यटक तिकडे आकर्षित होत आहेत आणि हे प्रमाण फार वाढत चालले आहे. तसेच मलेशिया, मालदीव, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळसह ६२ देशांमध्ये भारतीयांना व्हिसा न लागल्याने या ठिकाणांना प्राधान्य देत आहेत.
काही देश जिथे भारतीय व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात:
बार्बाडोस, भुटान, डोमिनिका, इक्वाडोर, एल साल्वाडोर, फिजी, ग्रेनाडा, हैती, जमैका, कझाकस्तान, मलेशिया, मॉरिशस, मायक्रोनेशिया, नेपाळ, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, सेनेगल, सेर्बिया, त्रिनिदाद आणि टोबैगो, ट्युनिशिया, वनुआतु, मालदीव, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका.
अशा देशांना भारतीय पसंती देत आहेत कारण येथे जाण्यासाठी व्हिसा तयार करण्याचा खरंच बऱ्यापैकी वाचतो. पण Christmas ची खरी मज्जा पाश्चिमात्य देशांमध्ये आहे, हे लक्षात घेणेही तितकेच खरे! २०१४ पासून देशात विमानतळांमध्ये वाढ झाली असल्यामुळे जनता विमानसेवेला जास्त प्राधान्य देत आहेत अशामध्ये देशात सध्या ७५० विमाने असून त्यातील २०० विमाने तांत्रिक अडचणीमुळे बंद आहेत आणि उर्वरित ५५० विमानांवर दडपण येत आहे. या कारणामुळे देशातील विमान सेवाही महागली आहे. परिणामी ‘मुंबई ते बँकॉक’ हा परदेशी प्रवास ‘मुंबई ते श्रीनगर’ या देशांतर्गत असणाऱ्या प्रवासापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त आहे.