Worst Prison For Women : आजच्या युगात महिलांना पुरूषांइतकेच अधिकार मिळाले आहेत. खरं तर, अनेक ठिकाणी महिलांनी पुरूषांना मागे टाकले आहे. नोकरी, व्यवसाय, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात महिला पुरूषांसोबतच नाव कमवत आहेत. ही समानता तुरुंगांपर्यंतही पोहोचली आहे. अनेक देशांच्या तुरुंगात महिलांना पुरूष कैद्यांपेक्षा जास्त सुविधा दिल्या जातात.
त्यांना चांगले अन्न, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा दिली जाते. पण प्रत्येक देशातील तुरुंगात अशाच सुविधा मिळत नाहीत. काही देश असे आहेत जिथे तुरुंग महिलांसाठी नरकाहून अधिक भयानक मानले जातात. या देशातील तुरुंगात असलेल्या महिला कैद्यांना दिली जाणारी वागणूक पाहूनच काय ऐकूनही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?
जगातील काही देशांच्या तुरुंगातील महिला कैद्यांची स्थिती खरोखरच खूप वाईट आहे. या देशांमध्ये महिलांना खूप वाईट वागणूक दिली जाते. या देशांमध्ये इराण, उत्तर कोरिया, सीरिया आणि सौदी अरेबियासारखे देश समाविष्ट आहेत. जिथे तुरुंगवासाच्या काळात महिलांवर शारीरिक छळ, जबरदस्तीने काम करणे आणि मानसिक छळ करणे सामान्य आहे. कधीकधी महिलांना वर्षानुवर्षे खटल्याशिवाय तुरुंगात ठेवले जाते.
त्यांना स्वच्छ पाणी, योग्य अन्न आणि वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. अनेक महिलांना कैद्यांनी गर्दीने भरलेल्या बराकीत ठेवले जाते, जिथे गोपनीयता नावाची कोणतीही गोष्ट नसते. बऱ्याचदा महिलांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याचीही परवानगी दिली जात नाही. या देशांच्या तुरुंगांना महिलांसाठी शिक्षेपेक्षा नरकासारखे मानले जाते.
भारतात महिला कैद्यांची संख्या पुरुष कैद्यांपेक्षा खूपच कमी आहे. बहुतेक तुरुंगांमध्ये महिला कैद्यांसाठी स्वतंत्र बराकी बनवल्या जातात आणि काही आवश्यक सुविधा देण्याची तरतूद देखील आहे. विशेषतः गर्भवती महिला किंवा लहान मुलांसह तुरुंगात असलेल्या महिलांसाठी नियम थोडे वेगळे आहेत. परंतु लहान शहरांच्या तुरुंगांमध्ये गर्दी सामान्य आहे. त्यामुळे महिला कैद्यांच्या समस्यांही वाढत चालल्या आहेत. पुरुषांपेक्षा तुरुंगात महिलांना जास्त सुविधा दिल्या जातात. तथापि, या परिस्थितीत अजूनही सुधारणा होण्याची शक्यता आहे.