Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राधिका मर्चंटचा मॅजेस्टिक प्रिन्सेस लुक, इंटरनेटवर व्हायरल फोटोजचा धुमाकूळ

Radhika Merchant White Gown Look: राधिका मर्चंट लवकरच अंबानी घराण्याची सून होणार आहे. काही दिवसांपूर्वी इटलीमध्ये अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग बॅशचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी राधिकाने केलेला मॅजेस्टिक लुक आता व्हायरल होतोय. राधिकाच्या सौंदर्यावरून चाहत्यांची नजरच हटत नाहीये.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 14, 2024 | 10:19 AM
राधिका मर्चंटचा मॅजेस्टिक प्रिन्सेस लुक, इंटरनेटवर व्हायरल फोटोजचा धुमाकूळ
Follow Us
Close
Follow Us:

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी अजून लग्नबंधनात अडकलेले नाहीत. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्या लग्नाचा बोलबाला सुरू आहे. गेल्यावर्षी साखरपुडा झाल्यानंतर, जामनगरमध्ये पहिले प्री-वेडिंग साजरे करण्यात आले आणि त्यानंतर मे-जूनमध्ये इटलीमध्ये दुसरे प्री-वेडिंग साजरे झाले. अंबानी कुटुंबाने दिलेले उत्सव, भव्यता, प्रभावी क्षण आणि सेलिब्रिटींसह रेड-कार्पेट यामुळे इंटरनेटवर आधीच धुमाकूळ घातला आहे. 

इटलीमध्ये या जोडप्याच्या भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर सध्या गाजावाज केलेला दिसून येत आहे.  यामध्ये आता सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेय ते राधिका मर्चंटच्या मॅजेस्टिक लुकने. एखाद्या राजकन्येइतकी सुंदर राधिका दिसत आहे. एखाद्या गोंडस आणि क्लासी अशा राजकुमारीच्या वेशात आणि पुस्तकातील परीकथेतील परी अवतरावी अशा स्वरूपातील राधिकाचा हा लुक दिसून येतोय. पाहा तिचा हा क्लासी एलिगंट आणि डोळे दिपवणारा लुक (फोटो सौजन्य – Instagram) 

राधिकाचा सॅटिन ड्रेस 

राधिकाने यावेळी आयव्हरी सॅटीन गाऊन परिधान केला आहे. अत्यंत मखमली असा क्रेप गुंडाळलेला हा बॉडीफिट ऑफशोल्डर गाऊन घालून राधिका एखाद्या राजकुमारीपेक्षाही अधिक सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर क्रिस्टल गुलाब जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे तिच्या लुकला अधिक शोभा आली आहे. 

क्रिस्टल रोझ हेडबँड 

राधिकाने या ड्रेसला साजेसा असा क्रिस्टल रोझ हेडबँड डोक्याला लावला आहे. मोकळे केस आणि त्यावर लावलेला हा एलिगंट हेडबँड तिची वेगळी स्टायलिंग दर्शवत आहे. तिचा हा लुक पाहून इंटरनेटवर सध्या आग लागली आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त राधिकाच्या लुकचीच चर्चा दिसून येतेय. 

रिया कपूरचे स्टायलिंग 

अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने राधिका मर्चंटचे स्टायलिंग केले असून तिने हा लुक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘खास दिवसासाठी सजली वधू राधिका मर्चंट. HAUTE COUTURE at its most glorious always with @tamararalph’ असे कॅप्शन तिने दिले आहे. डिझाईनर तमारा राल्फने या ड्रेसचे डिझाईन केले असून या ड्रेसमध्ये राधिकाचे सौंदर्य अधिक खुलून आल्याचे दिसून येत आहे. 

राधिकाची ज्वेलरी 

राधिकाने या ड्रेससह हिऱ्यांची अंगठी आणि आकर्षक ब्रेसलेट घातले आहे. अंबानीचे कोणतेही फंक्शन हिऱ्यांच्या दागिन्यांशिवाय पूर्ण होताना दिसत नाही. राधिकाच्या या लुकचीच सगळीकडे सध्या चर्चा असल्याचे दिसून येत आहे. राधिकाचा लुक हा एखाद्या ख्रिश्चन ब्राईडसारखा असला तरीही तिच्या सौंदर्याने त्याला एक वेगळेपणा दिलाय. 

मिनिमल मेकअप लुक 

राधिकाने या गाऊनसह केलेला मेकअप हा अत्यंत मिनिमल असून नैसर्गिक सौंदर्यावर अधिक भर दिली आहे. ग्लॅम लुकसाठी तिने डार्क भुवया, मस्कारा, विंग्ड आयलायनर, न्यूड लिप शेड, गालावर हायलायटर लावले आहे. तिचा हा लुक पाहातच राहण्यासारखा आहे. 

Web Title: Radhika merchant princess bride in her full glory for her 2nd pre wedding festivities with anant ambani leaves internet swooning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2024 | 10:19 AM

Topics:  

  • Radhika Merchant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.