
कैरीचा सीजन सर्व कैरीप्रेमींसाठी सुखाची पर्वनीच आहे. या दिवसांत बाजारातील प्रत्येक दुकानात कैरी बघायला मिळते. झाडाला मोहर आला की सगळीकडे कैरीचा काय छान सुगंध दरवळू लागतो. कैरीपासून अनेक खाद्यपदार्थ बनवले जतात, अधिकतम यापासून लोणचं बनवले जाते. मात्र काही लोक बऱ्याचदा भाजीत आंबटपणा आणण्यासाठीही याचा वापर करतात. कैरी कशीही खाल्ली तरी छानच लागते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत ती सर्वांनाच फार आवडत असते. अनेकजण कैरीच्या फोडी करून त्याला मीठ, मसाला लावून खातात.
कैरीचे फायदे:
[read_also content=”जर जेवणात जास्त मसाला असेल, तर तुम्ही या टिप्सने कमी करू शकता https://www.navarashtra.com/lifestyle/if-the-food-is-too-spicy-you-can-reduce-it-with-these-tips-537197.html”]
कैरीचे पन्हे
उन्हाळ्यात कैरीचे पन्हे एक चांगला पर्याय ठरतो. हा चवीला आणि आरोग्याला चांगला असतो. कैरीचे पन्हे बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरीला पाण्यात धुऊन स्वछ करा आणि मग गरम पाण्यात टाकून उकळवून घ्या. यानंतर कैरीची साल काढून कैरीचा गर काढून घ्या. आता यात थोडे पाणी, गुळ आणि वेलची पूड घालून सर्वकाही नीट एकजीव करून घ्या आणि हवे असल्यास याला फ्रिजमध्ये काही वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. तुमचे कैरीचे पन्हे तयार आहे.
कैरीची चटणी
कैरीची चटणी चवीला फार छान लागते. यासाठी पहिले कैरीला पाण्याने स्वछ धुवून घ्या आणि त्याच्या वरची साल काढा. आता मिक्सरमध्ये चिरलेली कैरी, किसलेले खोबरे, मीठ आणि लसूण घालून याची एक पेस्ट करून घ्या. यांनतर एक छान तडका तयार करा या चटणीवर टाका, तुमची चटपटीत कैरीची चटणी तयार होईल.
आंबा जॅम
आंब्याचा जॅम जरी बाजारात उपलब्ध असला तरी तुम्ही तो घरीदेखील सहज बनवू शकता. यासाठी आंब्याला गरम पाण्यात उकळवून घ्या आणि त्याची साल काढा. मग यात साखर घालून सर्वकाही नीट मॅश करून घ्या आणि याला काहीवेळ गॅसवर शिजत ठेवा, मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करा. तुमचा आंबट गोड जॅम तयार होईल.
कैरीचं लोणचं
करीचं चटपटीत लोणचं तयार करण्यासाठी कैरीचे तुकडे करा आणि यांना मीठ लावून बाजूला ठेवून द्या. आता एका कढईत तेल गरम करून यात मोहरीची डाळ, बडिशेप, हिंग, हळद घालून फोडणी करा आणि गॅस बंद करून टाका. मग ही फोडणी आंब्याच्या फोडीवर घाला आणि काही दिवस याला छान मुरू द्या . लोणचं जितके जास्त दिवस मुरेल तितकेच ते खायला छान लागेल.