भांडणादरम्यान नक्की काय करणे गरजेचे
“दोन भांडी सोबत ठेवली तर तर ती एकमेकांवर आदळतात” हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ही म्हण नात्यालाही लागू पडते. भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोन व्यक्तींमध्ये नातेसंबंधातील समस्या असणे हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु जेव्हा हे संघर्ष अथवा भांडणं वारंवार होतात आणि सोडवले जात नाहीत, तेव्हा ते नातेसंबंधाचा पाया कमकुवत करू लागतात.
आजकाल तुमच्या नात्यातही अशीच परिस्थिती निर्माण होत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आम्ही तुम्हाला अशाच 5 रिलेशनशिप टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या नात्यात आनंद परत आणू शकता. पण याचे योग्य पालन होणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासह या नात्यात टिकून राहयची तुमची इच्छाही असायला हवी (फोटो सौजन्य – iStock)
बोलण्यापूर्वी विचार करा
बोलण्यापूर्वी जरा विचार करण्याची गरज
भांडणाच्या वेळी बोलल्या जाणाऱ्या शब्दांची ताकद तलवारीपेक्षा कमी नसते. हे शब्द आपल्या नात्याचा नाजूक धागा पटकन तोडू शकतात. एकदा बोललेले शब्द परत घेतले जाऊ शकत नाहीत आणि ते आपल्या हृदयात कायमचे व्रण सोडतात. म्हणून, आपले शब्द विचारपूर्वक वापरा आणि जर तुम्हाला राग येत असेल तर थोडा वेळ जाऊ द्या अजिबात बोलू नका आणि शांत व्हा. मग शांतपणे तुमचा मुद्दा समजावून सांगा.
गोष्टी दाबून ठेऊ नका
मनात गोष्टी अजिबात ठेऊ नका
तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा. कदाचित तो तुमच्या भावना समजू शकणार नाही, पण तुम्ही जेव्हा मोकळेपणाने बोलाल तेव्हा तुम्ही काय बोलत आहात हे त्याला नक्कीच समजेल
हेदेखील वाचा – पती – पत्नीच्या नात्यात ‘वो’ ठरतेय नोकरी, असे सांभाळा नातं दुरावा करा दूर
जोडीदारावर रागावून झोपू नका
भांडण झाल्यावर एकमेकांशी न बोलता अजिबात झोपू नये
असं म्हटलं जातं की जोडीदाराशी भांडण झाल्यावर त्याच्याशी न बोलता रागाच्या भरात झोपणं कोणत्याही नात्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा स्थितीत, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही ती गोष्ट विसराल, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल कटुता नक्कीच राहते. त्यामुळे नेहमी भांडण सोडवल्यानंतरच झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे नाते घट्ट होईल आणि तुम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ याल.
ऐकण्याची सवय लावा
ऐकून घेण्याची सवय लावा
जेव्हा आपण कोणाशी बोलतो तेव्हा फक्त बोलणे पुरेसे नसते. समोरची व्यक्ती काय बोलत आहे हेदेखील आपण ऐकले पाहिजे. नातेसंबंधात, विशेषत: आपल्या जोडीदारासह, हे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण दोघे एकमेकांचे लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर भांडतो तेव्हा आपण फक्त आपल्या बाजूने चिकटून राहण्याचा प्रयत्न करू नये. इतरांचे विचारही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण एकमेकांचे ऐकले तर आपले प्रश्न सहज सुटू शकतात.
चुकीचे अर्थ न काढणे
चुकीचे अर्थ काढणं बंद करा
जेव्हा समोरचा माणूस रागवलेला असतो आणि काहीही बोलतो तेव्हा त्यातून चुकीचे अर्थ काढू नये. भांडण हे प्रत्येक नात्यात होतं. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढावा. कधीतरी समोरचा माणूस बरोबर असण्यापेक्षा त्याच्या बोलण्यामागच्या नक्की भावना काय आहेत हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीत लॉजिक देऊन आपणच बरोबर आहोत हे सांगण्यापेक्षा समोरच्या माणसाची मनस्थिती काय आहे त्यानुसार भांडणात समजून घेणं कधीतरी जास्त महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. विशेषतः मुलांना हे समजून घेण्याची अधिक गरज भासते.
हेदेखील वाचा – नात्यात केवळ प्रेमच पुरेसं नाही, यशस्वी होण्यासाठी जोडीदारांमध्ये ५ गोष्टी हव्याच
ब्रेक घेण्यात काहीच गैर नाही
अजिबात एकमेकांशी न बोलणं ठरू शकेल लाभदायक
जेव्हा तुमची आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडणे होतात तेव्हा त्या ठिकाणाहून काही काळ दूर जाणे खूप गरजेचे असते. हा एक ब्रेक आहे जो तुम्हाला शांत होण्याची आणि विचार करण्याची संधी देतो. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. या प्रकारचा ब्रेक तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्यास आणि परिस्थितीकडे चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतो.