शरीरावर असणारे नको असलेले केस हा सगळ्यांच्याच जीवनाचा भाग आहेत. स्वच्छता राखण्यासाठी आपण ते वॅक्सिंग अथवा शेविंग सारख्या कष्टदायक त्रास देणाऱ्या पद्धतीचा अवलंब करुन काढत असतो. त्यामुळे कधी त्वचेतून रक्त येते तर कधी नंतर हीच त्वचा रुक्ष झाली असल्याचे दिसून येते. तर कधी त्वचेवर काळे डाग पडल्याचे देखील दिसून येते.
याशिवाय सर्वांनाच असे उपाय सूट होतील असेही नाही. परंतु आता तुम्हाला अशा प्रकारे त्रास सहन करायची गरज नाही. यावर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सोपा घरगुती उपाय, ज्यामुळे तुम्हाला विनासायास नको असलेले केस काढता तर येतीलच यासोबतच तुमची त्वचा देखील मऊ राहील. जाणून घ्या हा उपाय कोणता आहे जो सगळेच करू शकतात.
या उपायासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे ताजे आले. आले स्वच्छ धुऊन त्या वर असलेली माती काढून घ्या. यानंतर सुरीच्या मदतीने त्यावरचे साल काढून घ्या. हे साल काढलेले आले पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. असे सालं काढलेलं व स्वच्छ धुतलेले ताजे आले किसणीच्या सहाय्याने बारीक किसून घ्या. हे ध्यानात ठेवा हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक घटक वापरून केला असल्याने तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
[read_also content=”लता मंगेशकर यांनी शेवटचं गायलं ‘हे’ गाणं, विशाल भारद्वाजने शेअर केले न रिलीज झालेले गाणे https://www.navarashtra.com/movies/lata-mangeshkar-last-unreleased-song-and-released-film-song-album-nrvb-233439.html”]
तुमची त्वचा कोणत्याही प्रकारचे असू दे. असे बारीक किसलेले आले एका गाळणीच्या मदतीने वरून चमच्याने दाबून त्यातील रस काढून घ्या. थोडक्यात आपल्याला यासाठी ताजे आले घेऊन त्याचा रस लागणार आहे. परंतु या रसामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी मिसळू नका. सुमारे दोन ते तीन चमचे आल्याचा रस येईल इतके आले घ्यावे. सुरुवातीला हा उपाय करताना थोड्या प्रमाणात करून बघा.
त्यानंतर ज्या प्रमाणे तुमच्या केसांची वाढ असेल किंवा जास्त केस असतील तर त्या प्रमाणानुसार या उपायातील घटकांचे प्रमाण कमी जास्त करावे. या ताज्या आल्याचा रसामध्ये एक चमचा Apple cider व्हिनेगर घाला. यामुळे तुमची त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्यानंतर या उपायात लागणारा पुढील घटक आहे तो म्हणजे मीठ. वरील मिश्रणामध्ये एक चमचा स्वयंपाक घरातील खाण्याचे मीठ घाला.
मीठामुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचे डाग पडत नाहीत. मिठामध्ये भरपूर प्रमाणात आयोडिन व सोडियम हे घटक असतात. असे मिश्रण चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर पंधरा मिनिटे हे मिश्रण असेच राहू द्या. तुम्ही हा उपाय शरीराच्या ज्या भागावर करणार आहात जसे की काखेत तर तो भाग सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडा करावा. लक्षात घ्या त्या जागी जळले, भाजले कापले असे काहीही असू नये. त्यानंतर कापसाचा गोळा घ्या.
[read_also content=”पेटीएमचं असं झालंय ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’, दोन्ही हात तुपात असूनही सोसावं लागतंय नुकसान https://www.navarashtra.com/business/paytm-loss-widens-to-rs-778-5-crore-in-q3-result-revenue-jumps-89-percent-know-all-the-details-here-nrvb-233400.html”]
कापसाच्या गोळ्याच्या मदतीने हे मिश्रण त्वरित केस रिमूव्ह करण्यासाठी शरीराच्या त्या भागावर हलक्या हाताने घासत लावा. चेहरा सोडून हा उपाय तुम्ही कोणत्याही भागावर करू शकता. अशाप्रकारे दहा मिनिटे हे त्वचेवर असेच राहू द्यावे त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे तुम्हाला नको-असलेल्या केसांची समस्या तर दूरच होईल. या सोबत तुम्हाला मिळेल नितळ मऊ डाग विरहित गोरी त्वचा.
तेव्हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. अगदी सर्वांनाच या समस्येला तोंड द्यावे लागते तेव्हा हा उपाय आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.