Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

House Painting Rules for Tenants: भाड्याच्या घराची पेंटिंग कोण करणार? मालक-भाडेकरू वाद टाळण्यासाठी जाणून घ्या नियम

House Painting Rules for Tenants: दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते. मात्र भाड्याच्या घरात राहताना रंगकामाचा खर्च मालकाने करायचा की भाडेकरूने, यावरून अनेकदा वाद होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 01:59 PM
House Painting Rules for Tenants (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

House Painting Rules for Tenants (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सर्वप्रथम भाडेकरारात पेंटिंगबाबत काय अट आहे, ते तपासा.
  • नैसर्गिक झीज असल्यास रंगकामाचा खर्च मालकाचा असल्याचे बातमीत म्हटले आहे.
  • भाडेकरूमुळे भिंतीचे नुकसान झाल्यास खर्च भाडेकरूला करावा लागू शकतो.
 

दसरा दिवाळी जवळ आली की सगळ्यांची घराची साफसफाई सुरू होते. सगळं घर स्वच्छ करणं, नवीन पडदे लावणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराला रंग देणं. घर रंगवलं की घर एकदम नवीन वाटतं.पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर हाच रंग देण्याचा विषय डोक्याला ताप होतो. घराला कलर कोण करणार? मालक करणार की आपण करायचा? यावरूनच बऱ्याच वेळा मालक आणि भाडेकरूमध्ये खटके उडतात. मालक म्हणतो तू राहतोस तू कर, भाडेकरू म्हणतो तुमचं घर तुम्ही करा. तर यावर नक्की कायदा काय सांगतो? House Painting Rules for Tenants:

सगळ्यात आधी तुमचा करारनामा बघा

तुम्ही घर भाड्याने घेताना एक अॅग्रीमेंट बनवले असेल. त्या कागदावर सगळं लिहिलेलं असतं. तो कागद नीट वाचणे खूप गरजेचं आहे.जर त्या अॅग्रीमेंटमध्ये असं लिहिलं असेल की “दरवर्षी किंवा घर खाली करताना भाडेकरूने रंग करून द्यावा”, तर मग तुम्हाला काही पर्याय नाही. तुम्हालाच तुमच्या खिशातून पैसे टाकून रंग करावा लागेल.पण जर अॅग्रीमेंटमध्ये रंगाबद्दल काहीच लिहिलं नसेल, तर मग कायदा सांगतो की घराला रंग देणं, व्हाईट वॉश करणं, दार-खिडक्यांना रंग मारणं हा सगळा खर्च घरमालकाचा असतो भाडेकरुचा नाही.

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

नैसर्गिकरीत्या रंग गेला तर मालक देणार

तुम्ही घरात 2-3 वर्ष राहिलात की भिंतीचा रंग आपोआप जातो. कधी कधी ओलावा येतो, कधी पिवळा पडतो याला नैसर्गिक झीज म्हणतात.अशावेळी जर तुम्हाला वाटतं की दिवाळीसाठी घर छान दिसावं म्हणून पेंट करावं, तर त्याचा खर्च मालकाने करायचा असतो. कारण घर जुनं होणं ही तुमची चूक नाही.पण जर तुम्ही भिंतीवर खिळे ठोकून-ठोकून भिंत फोडली असेल, लहान मुलांनी सगळ्या भिंतीवर पेन्सिलने चित्र काढली असतील तर मग मात्र तो खर्च तुम्हालाच द्यावा लागेल. तुमच्या चुकीमुळे भिंत खराब झाली तर मालक पैसे देणार नाही.

भाडेकरू हा भाडेकरू असतो, मालक हा मालक असतो, घर बळकावता येणार नाही …

मग आता काय करायचं? भांडण कसं टाळायचं?

दसरा दिवाळीसाठी फक्त घर सुंदर दिसावं म्हणून रंग करायचा असेल तर उगाच स्वतःच्या खिशातून पैसे घालू नका. सोपं काम करा. सगळ्यात आधी मालकाशी शांतपणे बोला. त्यांना सांगा की अॅग्रीमेंटमध्ये रंगाबद्दल काही लिहिलेलं नाही, त्यामुळे नियमाप्रमाणे तुम्ही खर्च करा. बऱ्याच वेळा बोलूनच विषय संपतो. जर मालक ऐकत नसेल तर त्यांना अॅग्रीमेंट दाखवा. त्यात काय लिहिलंय ते बघा. जर त्यात अट नसेल तर तुम्ही ठाम राहू शकता. एक महत्वाची गोष्ट, नवीन घर घेतानाच अॅग्रीमेंटमध्ये पेंटिंगबद्दल स्पष्ट लिहून घ्या. म्हणजे नंतर वादच होणार नाही. कोण रंग करणार, किती वर्षांनी करणार, हे आधीच ठरवून टाका.

Web Title: Rental house painting cost landlord or tenant rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • lifesytle news
  • new house.

संबंधित बातम्या

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
1

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
2

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट
3

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट

High BP at 30: तरुण वयातही वाढतोय High BP! 30 नंतर ‘इतक्या’ वेळा नक्की तपासा रक्तदाब
4

High BP at 30: तरुण वयातही वाढतोय High BP! 30 नंतर ‘इतक्या’ वेळा नक्की तपासा रक्तदाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.