Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाल्यावस्थेतील Blood Cancer च्या अनुवांशिकतेची भूमिका; पालकांनी काय जाणून घ्यावे

कॅन्सर हा असा आजार आहे जो कधीही आणि कोणालाही होऊ शकतो. हल्ली बाल्यावस्थेतच रक्ताच्या कर्करोगाची प्रकरणे वाढताना दिसून येत आहेत. रक्ताचा कर्करोग हा अनुवंशिक असतो का? पालकांना अनुवंशिकतेनुसार आपल्या बाळांसाठी काय जाणून घेणे महत्त्वाचे आहे आपण या लेखातून पाहूया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 16, 2024 | 11:38 AM
पालकांनी काय जाणून घेणे आवश्यक आहे

पालकांनी काय जाणून घेणे आवश्यक आहे

Follow Us
Close
Follow Us:

बाल्यावस्थेतील रक्त कर्करोग, जसे की ल्युकेमिया आणि लिम्फोमा, हे मुलांमध्ये आढळणारे सर्वात सामान्य कर्करोगांपैकी आहेत. जसे प्रौढांमध्ये कर्करोगाच्या वाढीमध्ये धूम्रपान किंवा आहार हे जीवनशैलीसारखे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात, तसे बाल्यावस्थेतील कर्करोग, रक्त कर्करोगासह बहुधा अनुवांशिक कारणांमुळे होतो. 

सप्टेंबर महिन्यात जागतिक बाल कर्करोग जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनुवांशिकतेची भूमिका समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे पालकांना कर्करोग कसा होऊ शकतो आणि त्याच्या उपचार व प्रतिबंधासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे कळू शकेल. याबाबत डॉ. कुणाल सेहगल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग सेहगल पॅथ लॅब यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

कसा होतो कर्करोगाचा विकास

कर्करोग कसा वाढतो

रक्तपेशींच्या डीएनएमध्ये झालेल्या अनुवांशिक बदलांमुळे पेशी अनियंत्रितपणे वाढतात, ज्यामुळे ल्युकेमिया सारख्या रक्त कर्करोगांचा विकास होतो. अनेक वेळा हे अनुवांशिक बदल पेशींच्या विभाजनादरम्यान स्वाभाविकरित्या होतात, आणि ते पालकांकडून मुलांकडे जात नाहीत. मात्र, काही मुलांना अशा अनुवांशिक स्थिती वारशाने मिळतात, ज्यामुळे रक्त कर्करोगाचा धोका वाढतो. 

हेदेखील वाचा – जर जिभेच्या खाली दिसली ‘ही’ लक्षणे, तर समजून जावा हा तर कॅन्सर!

जनुकांवर परिणाम

डाऊन सिंड्रोम, ली-फ्रॉमिनी सिंड्रोम आणि न्यूरोफायब्रोमॅटोसिस यांसारख्या स्थिती ल्युकेमिया किंवा इतर कर्करोगांचा धोका वाढवतात. या अनुवांशिक स्थितींमध्ये डीएनए दुरुस्ती किंवा पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणाऱ्या जनुकांवर परिणाम होतो. पालकांसाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, जरी अनुवांशिक संबंध असले, तरीही बहुतेक मुलांमध्ये रक्त कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास नसतो. अनेक प्रकरणांमध्ये विशिष्ट कारण अज्ञात राहते आणि पालकांकडून कर्करोगाचा थेट अनुवांशिक वारसा आढळत नाही. मात्र, संशोधन सतत हे उघड करत आहे की विशिष्ट अनुवांशिक बदल आणि सिंड्रोम्स कर्करोग होण्याची शक्यता कशी वाढवतात.

चाचणी आणि लवकर निदान

काही प्रकरणांमध्ये, ज्या मुलांना कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा ज्या अनुवांशिक स्थितींमुळे कर्करोगाचा धोका वाढतो त्या मुलांसाठी अनुवांशिक चाचणीची शिफारस केली जाऊ शकते. अनुवांशिक चाचण्या अशा बदलांना ओळखू शकतात, ज्यामुळे मुलांना रक्त कर्करोगाचा धोका असू शकतो. जर हे बदल आढळले, तर डॉक्टर लवकर निदान आणि हस्तक्षेपाचे धोरण सुचवू शकतात, ज्यामुळे संभाव्य समस्यांचे वेळेत निदान होऊन लवकर उपाययोजना करता येऊ शकतात.

उपचारासाठी अनुवांशिकतेचे परिणाम

उपचारादरम्यान परिणाम

अनुवांशिक घटक बाल्यावस्थेतील रक्त कर्करोगाच्या उपचारांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. काही अनुवांशिक बदलांमुळे कर्करोग केमोथेरपी किंवा टार्गेटेड उपचारांना कसा प्रतिसाद देईल यावर परिणाम होतो. मुलाच्या अनुवांशिक प्रोफाइलनुसार वैयक्तिकृत उपचार योजना आता सामान्य होत आहेत आणि यामुळे उपचारांचे यश अधिक सुधारण्याची शक्यता असते.

हेदेखील वाचा – उपवासामुळे कमी होतो कॅन्सर? रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर, एकदा वाचाच

आनुवंशिक घटकांची माहिती 

पालकांसाठी, बाल्यावस्थेतील रक्त कर्करोगाशी संबंधित अनुवांशिक घटकांची माहिती महत्त्वाची ठरते. जरी अनुवांशिकता कर्करोगाच्या विकासामध्ये काही अंशी जबाबदार असू शकते, तरी लवकर निदान आणि वैयक्तिकृत उपचारांच्या माध्यमातून बरी होण्याची शक्यता नक्कीच वाढते. जर तुमच्या मुलाला रक्त कर्करोगाचा धोका असेल किंवा निदान झाले असेल, तर बालकांच्या कर्करोग तज्ज्ञ आणि अनुवांशिक सल्लागारांशी सल्लामसलत करून चाचणी, उपचार आणि दीर्घकालीन काळजीबाबत योग्य मार्गदर्शन मिळवणे खूपच उपयुक्त ठरेल.

Web Title: Role of genetics in child blood cancer what parents should know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 11:38 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.