फोटो सौजन्य: Freepik
कॅन्सर हा एक भयंकर आजार आहे, जो दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच या आजारावर उपचार सुद्धा कठीण आहे. अशावेळी कॅन्सरला आटोक्यात आणायचे अनेक प्रयन्त लोकं करत असतात. काही तर युट्युबवरील उपायांनी कॅन्सर आटोक्यात आणायचा वेडा प्रयत्न करतात. पण आता नुकतेच एका रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, उपवास केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.
उपवास आणि कॅन्सर मधील संबंध
उपवासामुळे शरीरातील नॅचरल डिफेन्स सिस्टिम मजबूत होते असे उंदरांवर केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. उपवासामुळे कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करणाऱ्या नॅचरल किलर सेल्सची कार्यक्षमता वाढते. उपवासाच्या वेळी या पेशी आपल्या शरीरातील शुगरऐवजी फॅट वापरते. ज्यामुळे ते कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यास उपयोगी ठरतात.
मागील संशोधन आणि फायदे
2016 च्या एका संशोधनात असे आढळून आले की केमोथेरपीपूर्वी अल्पकालीन उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिसिटी कमी होऊ शकते. जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की अधूनमधून उपवास केल्याने लिव्हरला सर्वोत्तम फायदा होतो. खासकरून उपवासामुळे फॅटी लिव्हर, लिव्हरवरील सूज आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
उपवासाचे अन्य फायदे
उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स वाढतात, ज्यामुळे पेशींना कॅन्सरमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवले जाऊ शकते. परंतु हे प्रत्येक रुग्णामध्ये घडेल असे नाही. यावर अधिक संशोधन करणे आवश्यक आहे. विशेषतः त्या रुग्णांसाठी ज्यांचे वजन खूपच कमी आहे.