Rose Day 2025: आजच्या समाजात रोज डे कसा साजरा केला जातो? पारंपारिक पद्धतींचे आधुनिकरण आणि विरळ होत चाललेले प्रेम...
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचे वारे वाहणार आहेत. आता असे का? कारण याच महिन्यात येतो प्रेमाचा सप्ताह म्हणजेच ‘व्हॅलेन्टाईन्स वीक’. हा संपूर्ण आठवडा प्रेमाला समर्पित केला जातो. या आठवड्याचा प्रत्येक दिवस काही वेगळा भावना घेऊन येत असतो. या दिवसांत लोक आपल्या मनातील प्रेमाच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतात आणि म्हणूनच याला प्रेमाचा सप्ताह असे म्हटले जाते. यावर्षी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेन्टाईन्स वीक सुरु होत आहे आणि या पहिल्या दिवसाची सुरुवात ‘रोझ डे’ ने होणार आहे. आता हा रोझ डे नक्की काय आहे आणि काळानुसार याचे बदलत चालले रूप याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
रोझ डे काय आहे?
व्हॅलेन्टाईन्स वीकमधील पाहिला दिवस म्हणजे रोज डे! या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. अनेकजण आपल्या प्रेमाच्या कबुलीही या गुलाबाच्या फुलाच्या रूपात देत असतात. या दिवसानिमित्त लोक आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवू पाहतात.
केव्हापासून सुरु झाली रोज डे’ची परंपरा?
रोझ डेच्या इतिहासाबाबत बोलणे केले तर असे म्हटले जाते की, 19व्या शतकातील राणी व्हिक्टोरिया (1837-1901) चा काळ ब्रिटनमधील सांस्कृतिक बदलांसाठी ओळखला जातो. या काळात फ्लोरोग्राफीला (फुलांची भाषा) खूप महत्त्व प्राप्त झाले. यावेळी लोकांना आपले प्रेम आणि भावना उघडपणे व्यक्त करण्यात संकोच वाटला. त्यामुळे त्याने आपल्या भावना फुलांमधून व्यक्त करण्यास सुरुवात केली. राणी व्हिक्टोरियाला गुलाबाची खूप आवड होती आणि तिचा नवरा प्रिन्स अल्बर्टही तिला गुलाब द्यायचा. त्यांची प्रेमकहाणी पाहता त्या काळात गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जायचे. ही परंपरा व्हिक्टोरियन समाजात इतकी लोकप्रिय झाली की दररोज प्रेमपत्रे आणि प्रस्तावांची देवाणघेवाण सामान्य झाली. हळूहळू ही परंपरा संपूर्ण युरोपात आणि नंतर जगभर पसरली. या कारणास्तव व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डेने करणे ही एक महत्त्वाची परंपरा बनली आहे.
Rose Day 2025: रोज डेच्या दिवशी कोणता गुलाब कोणाला द्यावा? आधीच जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होतील
तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाची प्रगत साधने जी आता उपलब्ध आहेत ती नसतानाही लोक हा दिवस फार आनंदात आणि उत्साहात साजरा करत असे. तेव्हा लोकांकडे साधने जरी कमी असली तरी प्रेम आणि वेळ भरभरून होता, ज्याच्या जोरावर ते आपल्या जोडीदारसह हा दिवस वेगवगेळ्या रूपात साजरा करत असे…
चिठ्ठीतून होत असे संवाद
आपणा सर्वांना हे ठाऊक आहे की, पूर्वी जेव्हा स्मार्टफोन्स या दुनियेत अस्तित्वात नव्हते तेव्हा लोक चिठ्ठीतून एकमेकांशी संवाद साधत असायचे. या दिवशी ते आपल्या प्रिय व्यक्तीला चिठ्ठी लिहीत त्यावर आपल्या मनातील भावना व्यक्त करायचे आणि आपल्या प्रेमाच्या स्वरूपात यात गुलाबाच्या पाकळ्यांचा थर रचायचे. यातील गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध चिठ्ठीसह त्या व्यक्तीपर्यंत पोहचायचा आणि व्यक्तीला खुश करून टाकायचा.
गुलाबाचे फुल
पूर्वीच्या काळीही फुलांना तितकेच महत्त्व होते, मात्र हे महत्त्व फुलांच्या गुच्छ्यातून नव्हे तर एका गुलाबाच्या फुलातूनही व्यक्त होत असे. पूर्वीच्या काळी साधेपणाला अधिक महत्त्व होते, त्यामुळे जोडीदाराने दिलेले एक फुलंही मनाला सुख देऊन ज्यायचा. झाडांवरून तोडून आणलेले ते गुलाबाचे फुल आणि त्यासाठी केलेली ती धडपड काही वेगळीच असायची.
गजरा
गजरा हे एक पारंपरिक श्रुंगारचे प्रतीक आहे. महिलांना केसांत गाजर माळायला फार आवडते. अशात आपल्या जोडीदारासाठी आठवणीने पुरुष मंडळी गजरा घेऊन त्यांचा केसांत माळायचे, तुम्ही कधी विचारही केला नसेल मात्र अशाही पद्धतीने हा दिवस साजरा होत असे.
आधुनिक काळात अनेक गोष्टी बदलल्या असून तो साधेपणा या काळात फार कमी पाहायला मिळतो. आता हे प्रेमाचे दिवस फक्त प्रेम व्यक्त कारण्यापुरतीच मर्यादित राहिले नसून आता त्यात बडेजाव आणि शोबाजीची हवा देखील ॲड झाली आहे. पाण्यासारखा पैसे खर्च करून लोक हे दिवस साजरा करतात आणि आपल्या पार्टनरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात.
Valentine Day 2025 Special: आता IRCTC करणार तुमची मदत, गर्लफ्रेंडसोबत स्वस्तात करू शकता गोव्याची सफर
फुलांचा गुच्छ
जसे पूर्वीच्या काळी एका फुलाने समाधान मानले जायचे तसे आता होत नाही. आता बहुतेजण संपूर्ण फुलांचा गुच्छ भेट देऊन हा दिवस साजरा करतात. यातही काहीजण आपल्या पार्टनरला आनंदी करण्यासाठी हजारोंच्याही संख्येने हे गुलाब खरेदी करून गीफ्ट करतात.
कस्टमाइझ गिफ्ट
कस्टमाइझ गिफ्ट हा प्रकार आजच्या काळात फार ट्रेंड करत आहे. लोक आपल्या आवडी-निवडीनुसार आपल्या पार्टनरसाठी हवे तसे गिफ्ट स्वतः तयार करतात आणि मग ते छानश्या गिफ्ट रॅपरमध्ये पॅक करून आपल्या जोडीदारपर्यंत पोहचवले जाते. यात ब्रेसलेट, ग्रेटींग्स, फोटोफ्रेम अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.
डिनर डेट
प्रेमाचा दिवस म्हणजे एकत्र वेळ घालवणे मात्र आजकालच्या कामाच्या व्यापात लोकांकडे एकमेकांसाठी पुरेसा वेळ शिल्लक राहीला नाही अशात एक डिनरचा प्लॅन बनवून एकत्र थोडा वेळ घालवतात आणि रोज डे साजरा करतात.
सोशल मीडिया पोस्ट
आजकाल अनेकांच्या आयुष्यात सोशल मीडियाचा महत्त्व फार वाढले आहे. लोक आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी इथे पोस्ट करून सेलिब्रेट करतात. अशात या प्रेमाच्या दिवशीही लोक आपल्या जोडीदारासोबतच्या आठवणी, सोबतचे फोटो-व्हिडिओ शेअर करत अथवा जोडीदाराने दिलेल्या फुलाचा फोटो शेअर करून रोज डे साजरा करतात.
पूर्वीच्या काळात आणि या आधुनिक काळात दोन्ही काळात रोज डे महत्त्व जरी तितकेच असले तरी हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये बराच बदल घडून दिसून येते. पूर्वी जितक्या गोष्टी सध्या आणि सोप्या पद्धतीने केल्या जायच्या त्याच गोष्टी आता मोठ्या स्वरूपात केल्या जातात आणि जोडीदाराबाबतचे प्रेम यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो.