(फोटो सौजन्य: istock)
फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे, या महिन्याला प्रेमाचा महिना असे म्हटले जाते कारण या महिन्यातच व्हॅलेंटाइन्स वीक सुरु होत असतो. या दरम्यान अनेक कपल्स आपल्या जोडीदारासह मोकळा वेळ घालवतात आणि आपल्या प्रमाची कबुली देतायत. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे सुंदर जोडीदार असेल, तर या महिन्यात व्हॅलेंटाईन डे सहल करणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एका सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला IRCTC च्या एका अप्रतिम टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत, जे यावेळी गोव्याला भेट देण्याची संधी देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभरात ओळखला जातो, इथल्या नाइटलाइफची तुलना नाही. दरवर्षी हजारो देश-विदेशातील पर्यटक सुट्टीसाठी येथे येतात आणि अनेक सुंदर आठवणी घेऊन जातात. तुम्हालाही या ठिकाणाच्या सुंदर आठवणी तुमच्या हृदयात टिपायच्या असतील तर आधी IRCTC च्या या टूर पॅकेजविषयी सविस्तर जाणून घ्या.
1 Euro Houses Italy: फक्त 90 रुपयांत इटलीमध्ये घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण? जाणून घ्या कसे…
IRCTC गोवा टूर पॅकेज
IRCTC चे हे टूर पॅकेज अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे जे व्हॅलेंटाईन डेला समुद्रकिनारे असलेल्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत आहेत, अशा परिस्थितीत गोव्याला जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, IRCTC गोवा टूर पॅकेज 13 फेब्रुवारी 2025 पासून नागपूरपासून सुरू होत आहे. हा प्रवास विमानाने होणार आहे. अशा स्थितीत जागांची संख्या मर्यादित आहे. हे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com/pacakage ला भेट द्यावी लागेल.
पॅकेज किती दिवसांचा असेल?
IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे “GOA VACATIONS EX NAGPUR” असे आहे. याचा कोड WBA016C असा आहे. हे टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी गोव्यात असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी रोमँटिक डेट प्लॅन करू शकता आणि एक सुंदर संध्याकाळ घालवू शकता.
टूर पॅकेजमध्ये मिळतील या सुविधा
IRCTC टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी दिली जाईल. यासोबतच नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे. टूर पॅकेज बुक केल्यानंतर कोणत्याही प्रवाशाला वाहतुकीसाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. गोव्यातील सर्व वाहतूक सुविधा IRCTC द्वारे पुरविल्या जातील.
टूर पॅकेजची किंमत काय?
IRCTC ने गोवा टूर पॅकेजची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला लक्षात घेऊन ठरवली आहे. याचे सिंगल तिकीट रु 30100 आहे आणि डबल तिकिटाची किंमत 26150 रुपये आहे तसेच ट्रिपल ऑक्यूपेंसी तिकीटाची किंमत 25150 रुपये आहे. तथापि, जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला त्यांच्यासाठीही तिकिटे खरेदी करावी लागतील. या टूर पॅकेजमध्ये बेडसह 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचे तिकीट 21250 रुपये आणि बेड नसलेल्या मुलांचे तिकीट 20750 रुपये आहे. यासोबतच 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विना बेड तिकीट 13300 रुपये आहे. या टूर पॅकेजच्या मदतीने तुम्ही स्वस्तात तुमच्या जोडीदारासोबत गोव्याच्या सुंदर वातावरणाचा आनंद लुटू शकता.