कुटुंबातील सगळ्यांनी एकच साबण वापरावा का?
शरीर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करणे फार गरजेचे आहे. अंघोळ केल्यामुळे मनाला शांती मिळते आणि नेहमी आनंद आणि उत्साह शरीरात कायम टिकून राहतो. अंघोळ करताना महिला पुरुष कधी साबण वापरतात तर कोणत्याही ब्रँडचा बॉडी वॉश वापरला जातो. त्वचेवर साबण लावल्यामुळे घामामुळे चिकट आणि तेलकट झालेले अंग स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच शरीराच्या इतर अवयवांवर साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. पण अनेक घरांमध्ये अंघोळीसाठी घरातील सर्व व्यक्ती एकाच साबणाचा वापर करतात. पण एकाच साबणाचा अनेकांनी वापर केल्यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. घरातील व्यक्तींना झालेले त्वचारोग तुम्हाला सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुटुंबातील सगळ्यांनी एकच साबण वापरावा का? एकच साबण वापरल्यामुळे त्वचेवर काय परिणाम होतात? जाणून घेऊया सविस्तर.
हे देखील वाचा: दिवाळीमध्ये अभ्यंगस्नासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा केमिकल फ्री सुगंधी उटणे
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला पुरुष सतत काहींना काही करत असतात. त्वचेवर साबण लावण्याऐवजी अनेकजण फेशवॉश किंवा इतर प्रॉडक्टचा वापर करतात. पण अजूनही अनेक महिला त्वचेसाठी साबणाचा वापर करतात. तोच साबण अंघोळ करण्यासाठी किंवा मग हात धुवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. पण या सगळ्याचा त्वचेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी वापरलेल्या साबणाचा वापर करू नये.
कुटुंबातील सगळ्यांनी एकच साबण वापरावा का?
त्वचेवर साबण लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी दिसते. त्वचेमध्ये चिकटून राहिलेली सर्व घाण आणि मळ निघून जातो. तसेच हळूहळू त्वचेवरील मॉइश्चराय सुद्धा निघून जाते. त्यामुळे अंघोळ करताना त्वचा मऊ आणि निरोगी राहील अशा दर्जाचा साबण निवडावा. जेणेकरून त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. तसेच अंघोळ झाल्यानंतर त्वचा तेलकट होऊ नये म्हणून मॉइश्चरायझरचा वापर करावा.
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मेथी दाणे खाल्यास होऊ शकते आरोग्याचे नुकसान
कुटुंबातील सर्व व्यक्तींनी अंघोळीसाठी एकच साबण वापरू नये. कारण एकच साबण वापरल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया जमा होण्यास सुरुवात होते. साबणात जमा झालेल्या बॅक्टेरियामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येते, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. साबणाच्या वडीमध्ये ई-कोला, साल्मोनेला, शिगेला बॅक्टेरिया, नोराव्हायरस आणि रोटा व्हायरस यांसारखे जंतू जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी अंघोळ करण्यासाठी एकच साबण वापरू नये.