घरच्या घरी बनवा केमिकल फ्री सुगंधी उटणे
दिवाळी सण म्हटलं की सगळीकडे मोठी लगबग असते. दिवाळीसाठी नवीन ड्रेस, साडी, घरातील इतरांसाठी नवनवीन कपडे, दिवाळीचा फराळ इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. संपूर्ण देशभरात सगळीकडे दिवाळी सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. दिवाळीच्या अधल्या दिवशी घरात उटणं विकत आणलं जात. उटणं लावल्यामुळे त्वचेलक सुद्धा फायदे होतात. दिवाळी सणात स्वतःसोबत घराला सुद्धा नवीन लुक दिला जातो. पूर्वीच्या काळी दिवाळी सणाच्या आधल्या दिवशीच घरी उटणे बनवले जायचे. घरी तयार केलेले उटणे शुद्ध आणि नैसर्गिक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळी सणासाठी सुगंधी उटणे तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
उटणं लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी त्वचेवर उटणं लावले. उटणं बनवताना अनेक सुगंधी द्रव्यं, औषधी वनस्पती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते. उटणं शरीराला लावल्यामुळे शरीर सुगंधित आणि ताजेतवाने दिसते. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणाला बाजारात मिळणारे विकतचे उटणे आणण्यापेक्षा घरीच सोप्या पद्धतीमध्ये उटणं तयार करा. चला तर जाणून घेऊया उटणं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दिवाळीत केवळ प्रभु रामाचे घरी आगमन झाले नाही, तर पुराणात घडल्या अनेक गोष्टी