
फोटो सौजन्य: iStock
टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक शॉर्ट व्हिडिओ अॅप्स आले. पण त्यात सुपरहिट ठरले ते इन्स्ट्राग्राम रील्स. आज अनेक इन्फ्लुएन्सर्स या इंस्टग्राम रील्समुळे उदयास आले. तसेच कित्येक जण या अॅपमुळे चांगला पैसा कमावत आहे. पण जेव्हापासून हे रील्स लोकप्रिय ठरले आहे, तेव्हापासून अनेक जण विशेषकरून तरुण पिढी तासंतास रील्स बघत असते. इतरांसाठी जरी रील्स पाहणे हा विरंगुळा असला तरी यामुळे वेळ कसा निघून जातो हे कोणालाच समजत नाही.
इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करणे, सोशल मीडियावर मीम्स शेअर करणे, सोशल प्रोफाइल अपडेट करणे आणि रील-लाइफची वास्तविक जीवनाशी तुलना करणे आता सामान्य झाले आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.
एकदा Insulin घेतल्यास आठवडाभर साखर नियंत्रणात राहील? आरोग्यासाठी औषध चांगले की इन्सुलिन? जाणून घ्या
बस, ट्रेन, मेट्रो, घरात, कुटुंबात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधील एक सामान्य सवय म्हणजे प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतो. तसेच तासनतास फोन स्क्रोल करण्याची आणि इंस्टा रील्स पाहण्याची सवय आजकाल लोकांना इतकी जडली आहे की त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
रात्री जोपताना रील्स पाहणे ही खूप वाईट सवय आहे. यामुळे झोप न लागणे, डोकेदुखी, मायग्रेन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. रील पाहण्याची ही सवय केवळ तरुणांमध्येच दिसून येत नाही, तर १० ते ५५ वयोगटातील लोकांमध्येही दिसून येते. ज्यामुळे मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.
सुरुवातीच्या तपासणीदरम्यान काही रुग्णांनी मान्य केले की ते सुमारे दीड वर्षांपासून रील्स पाहत आहेत. ज्यामध्ये ते सकाळी उठल्याबरोबर रील पाहण्यास सुरुवात करायचे आणि रात्रीपर्यंत रील पाहत बसायचे. त्याच वेळी, काही लोकांनी मान्य केले की त्यांना WhatsApp वर शेअर केलेले रील्स पाहणे आवडते.
केवळ 10 रुपयात मिळेल शरीराला 22 ग्रॅम प्रोटीन, 4 शाकाहारी पदार्थांचे सेवन ठरेल रामबाण
जर ते रील पाहत नसेल तर त्यांना विचित्र वाटू लागते. एकीकडे, त्यांना डोकेदुखी होऊ लागते. तसेच कोणतेही काम करावेसे वाटत नाही.