मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी सोपी उपाय
जीवन जगताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी असेल तर जीवन जगताना आनंद आणि उत्साह निर्माण होतो. पण काही लोक सतत कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये नेहमीच व्यस्थ असतात. आजूबाजूला नेमकं काय चालू आहे, याकडे सुद्धा कधी त्यांचे लक्ष नसते. मनात नेहमी नकारात्मक विचार आल्यामुळे मानसिक स्थिती पूर्णपणे विस्कटून जाते. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे शारीरिक आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतात. बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा मानसिक आरोग्य सुधारले जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
जगभरात सगळीकडे वृंदावनचे प्रेमानंद महाराज प्रसिद्ध आहेत. देश विदेशामध्ये त्यांची भक्ती करणारे अनेक लोक आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी अनेक लोक लांबून लांबून जातात. शिवाय प्रेमानंद महाराज भक्तांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व शंकांचे निरसन करतात. त्यांचे विचार अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहेत. मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी जाणून घेऊया प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले सोपे उपाय.
जेव्हा मनात सतत वाईट आणि चुकीचे विचार येतात, तेव्हा देवाच्या नावाचा जप करावा. देवाचे नामस्मरण करण्यास सुरुवात करावी. यामुळे नकारात्मक विचार कमी होतात. देवाचे नामस्मण केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मन शांत होते.
प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार, गवंताचे नामस्मरण नियमित केल्याने मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात. चांगले विचार करण्याची ऊर्जा मनात निर्माण होते. तसेच यामुळे अधिक चांगले आणि सकारात्मक विचार मनात येतात आणि हळूहळू वाईट विचार निघून जातात.
भगवंताच्या नामात अद्भुत शक्ती आहे. नुसते नामस्मरण केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि नकारात्मक विचार कायमचे दूर जातात. त्यामुळे कितीही जीवनात धावपळ असेल तरीसुद्धा देवाच्या नावाचा जप करणे आवश्यक आहे.
प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार, मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत म्हणून तणाव दूर करणे आवश्यक आहे. नेहमी नेहमी तणावात राहिल्यामुळे आनंद निघून जातो. तसेच यामुळे मन अशांत होऊन जाते आणि मनामध्ये नकारात्मक वाईट विचार येतात. मनामध्ये जास्त नकारात्मक विचार येण्यास सुरुवात झाल्यानंतर देवाचे नामस्मरण करावे. अध्यात्माशिवाय मनातील नकारात्मक भावना थांबवणे कठीण आहे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार, सनातन धर्मात असे सांगितले आहे की भगवंताच्या नामाचा महिमा करता येत नाही. नामस्मरणानेच त्याचा महिमा कळू शकतो. जीवनातील संकटे आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताच्या नामाचा आधार घेतला पाहिजे. भगवंताचे नामस्मरण केल्याने मनातील सर्व प्रकारच्या चिंता आणि वाईट विचारांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे रोजच्या जीवनात नेहमी भगवंताच्या नामाचे नामस्मरण करणे आवश्यक आहे.