
कानाची छिद्रे लहान करण्यासाठी सोपे उपाय
सध्या सगळीकडे नवनवीन फॅशनचा ट्रेंड आला आहे. या बदलत्या युगात अनेक बदल होत असल्याने सर्वसामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच लोक नवीन आलेल्या ट्रेंडनुसार जगत आहेत. अनेक महिला आणि मुली कानांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कानात मोठे कानातले घालतात. पण मोठे कानातले घातल्यामुळे काहीवेळेस कानाची छिद्रे मोठी होतात. कानाची छिद्रे मोठी झाल्यानंतर कोणतेही मोठे किंवा छोटे कानातले देखील घालता येत नाहीत. वय वाढल्यानंतर कां हळूहळू खाली येण्यास सुरुवात होते. त्यामुळे जास्त मोठे आणि वजनाला जड असलेले कानातले घालू नये.
मोठे कानातले घालून अनेकदा कानाची छिद्र फाटून जातात. कानाची छिद्र फाटल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कानातले घालता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्जरी किंवा डॉक्टरकडे जाणून मोठी झालेली कानाची छिद्रे शिवून घ्या. शस्त्रक्रिया केल्यानंतर ही छिद्रे लहान होतील. आज आम्ही तुम्हाला मोठे कानातले वापरून मोठी झालेली कानाची छिद्र लहान कशी करायची, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही नक्की वापरून पहा.(फोटो सौजन्य-istock )
इअरलोब टेपचा वापर करून मोठी झालेली कानाची छिद्र लहान करता येतात. ही टेप बाजारात सहज उपलब्ध होते. टिकलीच्या आकाराची ही टेप कानाची छिद्र लपवण्यासाठी उपयुक्त आहे. कानातले घालण्याआधी कानाच्या दोन्ही बाजूने ही टेप चिटकवून घ्या. त्यानंतर कानातले घाला. यामुळे कान जास्त खाली येणार नाही. इअरलोब टेप तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता.
सर्जिकल टेपचा वापर करून मोठे झालेली कानाची छिद्र लहान होतात. तसेच यामुळे कान ओढले जात नाहीत. सामान्य टेपपेक्षा ही टेप थोडी वेगळी असते. यामुळे कानाला कोणतीही समस्या उद्भवत नाही. टेप वापरताना टेपचा छोटा तुकडा कापून कानाच्या मागच्या बाजूला लावून घ्या. त्यानंतर कानातले घाला. ही टेप कानाला लावून तुम्ही कोणत्याही पद्धतीचे कानातले घालू शकता.
मोठे झालेले कानाचे छिद्र लपवण्यासाठी कानाच्या मागील आणि पुढील बाजूस टेप लावून घ्या. त्यानंतर कोणतेही मोठे कानातले तुम्ही घालू शकता. मात्र ही टेप रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवा. टेप लावल्यानंतर सुद्धा जास्त जड आणि वजनाने मोठे असलेले कानातले घालू नका.