आइस फेशियल केल्याने त्वचेचे होणारे नुकसान
बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फेशिअल उपलब्ध झाले आहेत. सण समारंभाच्या वेळी आपण पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करून घेतो. फेशिअल केल्यानंतर त्वचा चमकदार आणि सुंदर दिसण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर ग्लो येतो. पण हल्ली सोशल मीडियावर आईस फेशियलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सेलिब्रिटींसह सर्व सामान्य लोक देखील हे फेशिअल करत आहेत. चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. शिवाय चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.
आईस फेशिअल तुम्ही घरी सुद्धा करू शकता.चेहऱ्यावर आईस फेशिअल करताना सर्वप्रथम बर्फाचा तुकडा घेऊन तो संपूर्ण त्वचेवर फिरवला जातो. त्वचेवर बर्फाच्या साहाय्याने मसाज केली जाते. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा वाढतो.पण आईस फेशिअल करताना त्वचेची योग्यरीत्या काळजी घेतली नाही तर चेहरा खराब होण्याची शक्यता असते. यामुळे अनेकदा त्वचा निस्तेज होऊन जात. आईस फेशिअल करताना त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर कोणते दुष्परिणाम होतात, जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
आईस फेशिअल चुकीच्या पद्धतीने केल्यास चेहऱ्यावर पुरळ किंवा ऍलर्जी येण्याची शक्यता असते. हे पुरळ संपूर्ण चेहऱ्यावर आल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. ऍलर्जीमध्ये लहान-मोठे रॅशेस संपूर्ण चेहऱ्यावर दिसू लागतात.
चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे त्वचा जळून जाते. तसेच इतर कोणत्याही थंड गोष्टी त्वचेला लावल्यास त्वचा जळण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर जळजळ होण्यास सुरुवात होते.
आइस फेशियल केल्याने त्वचेचे होणारे नुकसान
काही महिलांची त्वचा आधीच कोरडी असते. त्यात जर आईस फेशिअल केले तर त्यांची त्वचा आणखीन कोरडी पडण्यास सुरुवात होते. बर्फामध्ये असलेल्या आयसिंगमुळे त्वचा कोरडी होऊन जाते. हे आयसिंग त्वचेसाठी घातक आहे. बर्फ त्वचेमधील ओलावा शोषून घेतो आणि नंतर त्वचा कोरडी होते.
संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर बर्फ लावू नये. यामुळे चेहरा लाल होऊन जळजळ होण्यास सुरुवात होते. जास्त वेळ बर्फ त्वचेवर चोळल्यानंतर ऍलर्जी, पुरळ येऊ शकतो.