'या' पेयांचे करा सेवन, वाढेल शरीराची डिटॉक्स पावर. (फोटो सौजन्य - Social Media)
लिंबू पाणी + काकडी = त्वचेसाठी लाभदायक लिंबू आणि काकडी यांचे मिश्रण त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते, कारण दोन्ही घटकांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
लिंबू पाणी + पुदीना = पचन सुधारण्यासाठी पुदीन्याचे गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, तसेच गॅस व पोटाच्या तक्रारी दूर करण्यासही हे प्रभावी ठरते.
लिंबू पाणी + आले = वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि आले एकत्र घेतल्याने शरीरातील चरबी जळण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास सहाय्य होते.
लिंबू पाणी + लसूण = इम्युनिटी मजबूत करण्यासाठी लिंबू आणि लसूण शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात आणि रोगप्रतिकारक यंत्रणा सुदृढ ठेवतात.
लिंबू पाणी + मध = शरीर शुद्ध करण्यासाठी मध आणि लिंबू यांचे मिश्रण शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते.