मेथी दाण्यांचा केसांना होणार फायदा
निरोगी आणि सुंदर केसांसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. केसांची वाढ मजबूत आणि लांबलचक होण्यासाठी काही महिला बाजारात मिळणाऱ्या महागड्या शॅम्पू किंवा हेअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र याचा फारसा परिणाम केसांवर दिसून आला नाही की पुन्हा नवीन प्रॉडक्ट वापरण्यास सुरुवात करतात. यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात होते. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करणे गरजेचे आहे. यामुळे केसांची वाढ चांगली होऊन केस मजबूत आणि घनदाट होतात.
अनेकांना टाळू इन्फेक्शन झाल्यानंतर केसांमध्ये कोंडा होणे, बुरशीजन्य आणि बॅक्टेरिया वाढणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून केसांची योग्य ती काळजी घ्यावी, ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि सुंदर दिसतील. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केस सतत गळतात का? मग केसांच्या वाढीसाठी आहारात ‘या’ बियांच्या मिश्रणाचे करा सेवन
केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे प्रभावी आहेत. केसांच्या वाढीसाठी प्रामुख्याने घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. मेथी दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण मोत्याच्या प्रमाणावर आढळून येते. तसेच मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक ॲसिड, विटामिन ए, के आणि सी मुबलक प्रमाणात आढळून येते. शिवाय पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे मेथी दाण्यांमध्ये असतात. चिकट आणि तेलकट केसांपासून सुटका मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा.
मेथी दाण्यांचा केसांना होणार फायदा
हे देखील वाचा: प्लास्टिक किंवा लाकडी कंगवा कोणता वापरणे अधिक फायदेशीर?
केसांच्या वाढीसाठी दही आणि मेथी दाणे अतिशय प्रभावी आहेत. मेथीमध्ये असलेल्या प्रथिनयांमुळे केसांना पोषण मिळते तर दही लावल्यामुळे केस मऊ आणि सिल्की होतात. केसांची मूळ मजबूत होण्यासाठी फक्त हेअर मास्क किंवा हेअर केअर रुटीन फॉलो करून चालत नाहीतर केसांच्या वाढीसाठी प्रभावी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे सुद्धा आवश्यक आहे.