sunburn
उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न (Sun Burn) आणि टॅनिंगची समस्या खूप सामान्य आहे. पण सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला सन पॉयझनिंग (Sun Poisoning) देखील होऊ शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का? सनबर्न आणि सन पॉयझनिंग हे एकच आहे, असा गैरसमज अनेकांच्या मनात असतो. मात्र सन पॉयझनिंग हे सनबर्नपेक्षा जास्त धोकादायक आहे. सन पॉयझनिंग हा सनबर्नचा सगळ्यात घातक प्रकार आहे. जेव्हा आपण सूर्याच्या पॅराव्हायोलेट किरणांच्या संपर्कात जास्त वेळ असतो तेव्हा असं होतं. ही समस्या दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्वचेची जळजळ होते आणि खवले तयार होऊ लागतात. सन पॉयझनिंगची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
सन पॉयझनिंगची लक्षणे
सन पॉयझनिंग वाढलं तर त्यातून पू किंवा पाणी येऊ लागतं. काही दिवसात वेदना आणि सूज येऊ लागते. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स निघून जातात, तेव्हा गंभीर लक्षणे दिसू लागतात. मळमळ वाटणे, गोंधळ वाढणे, तीव्र थंडी जाणवणे आणि स्नायूंमध्ये वात येणे, अशी लक्षणे दिसतात.
सन पॉयझनिंगपासून बचाव करण्याचे उपाय
कशी घ्याल काळजी ?
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण योग्य काळजी न घेतल्यास उन्हाळ्यात तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनू शकते. कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन ॲलर्जी अशा अनेक समस्या निर्माण होतात. सनस्क्रीनचा वापर, मॉईश्चरायझिंग, एक्सफोलिएटिंग, स्वत:ला हायड्रेट ठेवणं या गोष्टी करणं आवश्यक आहे.