भारतीयांच्या जेवणात साधारणपणे कार्बोहायड्रेट,प्रोटीन आणि विविध पोषण मुल्यांचा समावेश असतो. त्यात कार्बोहायड्रेट आणि तेलकट पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक असतात.यामुळे, ब-याचवेळा वजन नियंत्रणात राहण्याऐवजी वाढत जातं. त्यात आरोग्यावरही विपरीत परिणाम दिसतात. आहारतज्ज्ञ नेहमी पोषक आहार घ्यावा त्यात पोळी,भाजी,भात,वरण,सलाड यांचा समावेश असावा. भात आणि पोळी सर्वाधिक कार्बोहायड्रेट असतात. प्रोटीन हे डाळी आणि चिकन मधून मिळतात. तर, गोड पदार्थातून एनर्जी मिळत असली तरी, त्यातून रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काही पदार्थांचं सेवन करताना अगदी जपून करावं.
चहा,साखर,तेलकट-तुपकट पदार्थ,पोळी,भात आणि चिकन यांच्या सेवनाचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेऊ
चहा-
सर्व भारतीयांचं हे आवडत पेय…त्यामुळे,प्रत्येकाची सकाळ सुरू होते ती गरामागरम चहाने…चहा न घेतल्यास त्यांना उत्साह वाटतही नाही.तर अशाच लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण अति चहा हा शरीरासाठी घातक असतो.
चहा चे शौकीन आहात…सावधान..! आधी वाचा ही माहिती
जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही अत्यावश्यक माहिती
बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटाचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील.
चहाचे दुष्परिणाम….
साखर-
साखर ऊर्जेचा जलद स्रोत आहे. मात्र,साखरेच्या अतिसेवनामुळे भविष्यात अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. या विकारांपैकी एक म्हणजे मधुमेह
रोजच्या चहा,कॉफी,सरबत,कोल्ड्रींकसोबत साधारपणे 50 ग्रॅम साखर पोटात जात असते. मात्र, साखर बंद न करता ती कमी करणे कधीही योग्य आणि फायदेशीर ठरते.
साखर आहारातून वर्ज्य करण्याचे फायदे –
भात किंवा राईस-
पोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं तर काही जण राजमा-चावलचे चाहते असतात. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो. काही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे, जवळपास अशक्यच. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं का? प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात? हे जाणून घेऊयात….
खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं
भात खाण्याचे तोटे –
पोळी किंवा चपाती, रोटी-
भारतीय आहारात पोळी / चपाती हा एक प्रमुख पदार्थ आहे. अनेकांना दिवसातून दोन्ही वेळा जेवणात फक्त चपाती आणि भाजी खायला आवडते. मात्र, काही लोकांसाठी, गव्हाची चपाती खाल्ल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भ्ऊ शकतात. ज्यामुळे आपली दैनंदिन दिनचर्या ढासळू शकते. चला तर जाणून घेऊया आपल्या गव्हाच्या पोळीबद्दल,अर्थातच चपातीबद्दल…
पोळी / चपाती / भाकरी इत्यादींमधील कॅलरिजचे प्रमाण
१ बाजरीची भाकरी– ९७ कॅलरिज
१ नाचणीची भाकरी– ८८ कॅलरिज
१ मक्क्याची रोटी – १५३ कॅलरिज
१ थालिपीठ – १०० कॅलरिज
१ तंदुरी रोटी – ११६ कॅलरिज
१ फुलका – ५७ कॅलरिज
१ रुमाली रोटी – ७८ कॅलरिज
१ ज्वारीची भाकरी– ३० कॅलरिज
या विविध पोळ्यांमधील कॅलरीज पाहून त्यांची निवड करू नका. इतर पोळ्यांच्या तुलनेत गव्हाच्या चपातीमध्ये कमीत कमी कॅलरिज असतात. सामान्यपणे एका वेळेस एक व्यक्ती २-३ पोळ्यांचा आहारात समावेश करते. मात्र, वजन घटवणार्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे कारण पोळ्यांचा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवण्यापेक्षा एखादी पोळी कमी करून त्याऐवजी फळं किंवा भाजीचा आहारात समावेश करावा.
चपाती खाल्ल्यानंतर फुगल्यासारखे वाटते?
पोळी जेवणात अधिक असल्याने आपल्याला कधी कधी पोटात जड वाटायला लागते. कारण पोळी पचायला जड असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. ते होताना त्याची काही लक्षणे खालील प्रमाणे सांगता येईल.
चिकन खाताय!!! मग वाचा फायदे आणि तोटे-
मांसाहार खाणाऱ्यांमध्ये चिकनची क्रेझ एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की फक्त चिकनचं नाव ऐकूनच त्यांना अनेक पदार्थ दिसू लागतात. पण चिकनची खासियत फक्त त्याच्या चवीत नाहीये तर चिकन खाण्याचे अनेक फायदेही आहेत.
प्रोटीन सप्लाय- चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्यास प्राधान्य दिलं पाहिजे.
वजन कमी करण्यात होते मदत- सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
हाडांची ताकद वाढते- प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरीरात गाठी होण्याचा धोका कमी होतो.
तणावापासून मुक्ती- चिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करतं. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.
तेलकट -तुपकट पदार्थ –
ज्या लोकांना फास्ट फूड किंवा तेलकट स्नॅक्स खायला आवडतात त्या लोकांना लठ्ठपणासह मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय तेलकट पदार्थांचं अधिकाधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं. अन्नपचनासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, अतिसार आणि उलट्या यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
हार्ट अटॅकचा धोका…
तेलकट, तुपकट पदार्थांचं सेवन केल्याने व्यक्तीला हार्ट अटॅकचा झटका येण्याचा धोका वाढतो.
त्वचेचे आजार…
अन्नपदार्थांमध्ये असलेल्या अधिक तेलामुळे व्यक्तीला चेहऱ्याचे आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्ही कितीही फुडी असाल तरी बेताने खा….कारण, तुमच्या शरीरा सोसवेल तेवढचं खाल्ले तर विकारांना तुम्ही बळी पडणार नाही.