The moles on the feet reveal secrets related to human life
ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या ग्रहांचे विश्लेषण करून, त्याचे भविष्य आणि स्वभाव सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामद्रिकशास्त्रात मानवी शरीरावर उपस्थित असलेल्या अवयवांच्या रचनेच्या आधारे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते(The Moles On The Feet reveal secrets related to human life).
पायावर असलेले तीळ माणसाच्या आयुष्याशी संबंधित रहस्येही उघड करतात. अनेकदा पायवरील तीळ प्रवासाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. पण पायावर तीळ म्हणजे केवळ प्रवास असाच असा अर्थ नसतो. त्याचे इतरही अनेक अर्थ आहेत असे सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे. पायांवर तीळ असल्याचे काय अर्थ आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या पायाच्या वरच्या भागावर म्हणजेच उजव्या मांडीवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप कामुक आहे, असे दर्शवते. असे लोक खूप आकर्षक असतात. त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडते. हे लोक समोरच्या व्यक्तीला पहिल्याच भेटीतच वेड लावतात. त्यांना फिरायला आवडते. हे लोक जिथे जातात तिथे आपली छाप सोडतात.
ज्या व्यक्तीच्या पायाच्या उजव्या मांडीवर तीळ असतो, तो खूप कलात्मक असतो. सामद्रिकशास्त्रात असे मानले जाते की अशा लोकांना स्वयंपाक करणे आणि खाणे खूप आवडते. हे लोक आनंदी मानले जातात. हे लोक कला प्रेमी आणि कला जाणकार असतात. त्यांची समाजात वेगळी ओळख असते.
सामद्रिकशास्त्रानुसार ज्या लोकांच्या उजव्या गुडघ्यावर तीळ असतो, असे लोक धैर्यवान आणि निर्भय असतात. या लोकांचं करिअर सैन्य आणि पोलिसात घडतं. हे लोक खूप असंवेदनशील असतात. ते हट्टी स्वभावाचे असल्याचे बोलले जाते. हे लोक अहंकारी असतात. एखाद्याच्या बोलण्याने ते लगेच दुखावले जातात आणि या लोकांना लगेच राग येतो.
उजव्या पायाच्या खालच्या भागात म्हणजे गुडघ्याच्या खाली आणि टाचेच्या वर तीळ असेल तर असे लोक साहसी असतात, असे म्हणतात. त्यांना आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा असतो. तसेच, हे लोक जीवनात शांतता शोधतात. शांततेसाठी ते काहीही करायला तयार असतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात.
सामद्रिकशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या लोकांच्या डाव्या गुडघ्यावर तीळ असतो, ते खूप भावुक असतात. असे लोक प्रामाणिक आणि लवकर मैत्री करणारे असतात. ते इतरांशी मोकळेपणाने बोलतात आणि समोरच्याकडूनही तशीच अपेक्षा करतात.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]