प्राण्यांच्या प्रेमापोटी Gen-Z ला नकोय मूल, देशातील 70 टक्के जन्मदर घटला
भारतासह इतर सर्वच देशांमध्ये पाळीव प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर सांभाळले जाते. पाळीव प्राण्यांच्या प्रेमापोटी अनेक लोक त्यांचा घरी नेऊन लहान मुलांप्रमाणे सांभाळ करतात. शिवाय पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्य म्हणून मानले जातं आहे. मात्र आता पाळीव प्राण्यांचे मालक नाहीतर त्यांचे पालकत्व सुद्धा सांभाळले जात आहे. (फोटो सौजन्य – iStock)
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये Gen – Z सध्या पाळीव प्राण्यांकडे जास्त आकर्षित झालेले दिसून येतात. मुलांना जन्म देऊन पालक होण्यापेक्षा त्यांना कुत्रे आणि मांजरीचे पालक होणे अधिक आवडत असल्याचा धक्कादायक अहवाल आता समोर आला आहे. ही पिढी पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्य म्हणून पाहते आणि मूलभूत गरजांच्या पलीकडे यामध्ये वाढ होत आहे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मार्स पेटकेअरनुसार, 66% भारतीय Gen – Z आणि हजारो पाळीव प्राण्यांचे पालक म्हणतात की, त्यांचे पाळीव प्राणी त्यांच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहेत, जागतिक सरासरी 47% च्या तुलनेत भारतात प्रथमच पाळीव प्राण्यांच्या मालकीमध्ये वाढ होत आहे, 70% पाळीव प्राण्यांचे पालक या श्रेणीमध्ये येतात. जगभरात सगळ्यांचा कुत्रा हा सर्वाधिक आवडता प्राणी असल्याचंही दिसून येत आहे.
शिवाय अनेक लोक मांजरीसुद्धा सांभाळतात. मांजरी त्यांच्या चंचल स्वभावामुळे आणि तणाव कमी करणाऱ्या त्यांच्या मजेशीर हालचालींमुळे जगभरात सगळीकडे लोकप्रिय आहेत. शहरांमध्ये पाळीव प्राण्यांच्या पालकांना त्यांना सांभाळण्यासाठी खूप कमी जागा मिळते. शिवाय त्यांना तिथे मर्यादित पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
मुलांना जन्म देण्यापेक्षा प्राण्यांचे पालक म्हणून सध्याची पिढी पाहत असल्याचे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मुलांचे वाढते खर्च आणि त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या अपेक्षा आणि मोठे झाल्यानंतर त्यांच्याकडून होणारे अपेक्षाभंग यापेक्षा आपल्याला सोबत म्हणून आपले आवडते प्राणी घरात असावे असाच ट्रेंड आणि अशी मानसिकता सध्याच्या जनरेशनमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. सेलिब्रिटीच नाहीत तर सामान्य माणसंही सध्या या विचाराने आपल्या घरात मुलांना जन्म न देता पाळीव प्राणी पाळत आहेत आणि यामुळेच भारतात मुलांचा जन्मदरही घटला असल्याचे दिसून येत आहे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय काळजी, ग्रूमिंग आणि लक्झरी स्पा यासारख्या प्रीमियम सेवांमध्ये सुद्धा चालू करण्यात आल्या आहेत. मार्स पेटकेअरच्या “बॅटर सिटीज फॉर पेट्स” सारख्या उपक्रमांचे उद्दिष्ट शहरी भागांना अधिक पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल बनवण्याचे आहे. तर एनजीओ आणि “इंडी प्राउड” सारख्या मोहिमांचे सहकार्य समुदायातील प्राण्यांना दत्तक घेण्यास आणि त्यांची काळजी घेण्यावर अधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. पाळीव प्राण्यांकडे मालमत्ता म्हणून न पाहता सोबती म्हणून पाळीव प्राणी पाळले जावे, याकडे जास्त भर दिला जात आहे.